ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबर निकाह केल्याचे बोललं जात आहे. त्यांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राखी सावंतने स्वत: तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याबरोबर तिने तिचे लग्न लपवण्यामागचे कारणही सांगितले आहे.

राखी सावंतने इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आदिल आणि राखी यांच्या गळ्यात वरमाळा आणि हातात मॅरेज सर्टिफिकेट घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये लग्नाची तारीख २९ मे २०२२ लिहिलेलं दिसत आहे. याचा अर्थ राखी आणि आदिलचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. राखी सावंतचे हे दुसरं लग्न आहे. नुकतंच तिने या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

आणखी वाचा : गळ्यात वरमाला, हातात मॅरेज सर्टिफिकेट; नवविवाहित राखी सावंतच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहिलेत का? 

राखी सावंत काय म्हणाली?

“मी आणि आदिलने लग्न केलं आहे. आमचं सात महिन्यांपूर्वीच लग्न झालंय. आम्ही आधी कोर्टात लग्न केलंय आणि त्यानंतर निकाह केला. आदिलनं मला लग्न लपवून ठेवायला सांगितलं होतं. त्यामुळे मी या लग्नाबद्दल ७ महिने लपवून ठेवलं. पण आता आमचं लग्न सगळ्यांसमोर येणं गरजेचं आहे. कारण माझ्या आयुष्यात सध्या खूप काही घडत आहे.

आदिलला असे वाटत होते की जर त्याचे आणि माझ्या लग्नाचे सत्य बाहेर समजले तर त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी कोणीही मुलगा सापडणार नाही. तिला लग्नासाठी मुलगा शोधणे कठीण होईल. तुझं नाव माझ्याबरोबर जोडलं गेलं तर माझी बदनामी होईल, असेही त्याला वाटले होते. म्हणून त्याने मला लग्न लपवण्यास सांगितले होते”, असे राखी सावंत म्हणाली.

आणखी वाचा – “अगदी राखी सावंतलाही लग्नासाठी…” तस्लिमा नसरीन यांचे इस्लाम आणि धर्मांतराबद्दल मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राखीच्या लव्ह लाइफची नेहमीच चर्चा होताना दिसते. राखीनं २०१९ मध्ये एनआरआय असणाऱ्या रितेशबरोबर लग्न केलं होतं. ते दोघे बिग बॉसच्या रिअ‍ॅलिटी शो मध्येही दिसले होते. पण २०२२ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याचवर्षी राखी आणि आदिलने डेट करण्यास सुरुवात केली.