बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला आज(१९ जानेवारी) मुंबई पोलिसांनी अटक केली. आक्षेपार्ह व्हिडीओ व फोटो व्हायरल केल्याप्रकरणी शर्लिन चोप्राने राखीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. चौकशीला हजर न राहिल्यामुळे पोलिसांनी राखीला ताब्यात घेतल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. राखीने काल अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून तिला अटक करण्यात आली.

दरम्यान, राखी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. ‘बिग बॉस मराठीचं घर डोक्यावर घेतलेल्या राखीने घरातून बाहेर पडताच तिच्या व बॉयफ्रेंड आदिल खानच्या लग्नाबाबत गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओही व्हायरल झाले होते. राखीने लग्नानंतर नाव बदलून फातिमा केल्याचीही चर्चा होती. बराच ड्रामा केल्यानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. आता राखीला अटक झाल्यानंतर आदिल पुन्हा चर्चेत आला आहे.

हेही वाचा>> राखी सावंतच्या अटकेनंतर कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “शर्लिन चोप्राविरोधात…”

आदिल हा धर्माने मुस्लीम असून राखीपेक्षा १७ वर्षांनी लहान आहे. तो एक व्यावसायिक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आदिलने सुरुवातीला आइसक्रिम पार्लरचा व्यवसाय केला होता. त्यानंतर त्याने ए.डी.थिंक.फील.ड्राइव्ह हा कारचा व्यवसाय सुरू केला. आदिल आलिशान आयुष्य जगत असून तो महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. त्याने राखीला ४३ लाख किंमतीची बीएमडब्ल्यू गिफ्ट म्हणून दिली होती. आदिल सात ते आठ कोटी संपत्तीचा मालक आहे.

हेही पाहा>> Photos: अभिनेत्रीचा ‘तो’ एक व्हिडीओ आणि राखी सावंतला अटक, नेमकं प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी सावंत व आदिल खान गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मे २०२२मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज व निकाह पद्धतीने विवाह केला. त्यांची लग्नाची बातमी समोर आल्यानंतर राखीच्या गरोदरपणाबाबतही चर्चा रंगल्या होत्या. परंतु, सगळ्या अफवा असल्याचं म्हणत आदिल खानने या चर्चांना पूर्णविराम दिला होता.