अभिनेत्री राखी सावंतची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राखीचे रुग्णालयातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माहितीनुसार हृदयाशी संबंधित आजारामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याची चर्चा आहे.

राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेश सिंगने आता तिच्या आजारपणाबाबत एक मोठी अपडेट शेअर केली आहे. ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत रितेश म्हणाला की, पोटात आणि छातीत दुखू लागल्याने राखीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही चाचण्यांनंतर डॉक्टरांना राखीच्या गर्भाशयात गाठ सापडल्याचा दावा रितेशने केला आहे.

रितेशच्या म्हणण्यानुसार, राखीला कर्करोग झाल्याचा डॉक्टरांना संशय आहे. तथापि, अतिरिक्त चाचणी निकालांची प्रतीक्षा रितेश आणि सगळेच करीत आहेत.

हेही वाचा… “यांनी पुरस्कार मला का दिला?”, लोकप्रिय चित्रपटासाठी मिळालेला पुरस्कार सलमान खानने नाकारला होता; म्हणाला, “माझ्यापेक्षा मनोज बाजपेयी…”

“छातीत दुखू लागल्याने तिला मंगळवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर तिच्या रिपोर्ट्सकडे लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरांना तिच्या गर्भाशयात ट्यूमर सापडला आहे. तिच्या पोटातही दुखत होतं. हा कर्करोग असावा, असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. कर्करोग आहे की नाही हे तपासल्यानंतर कर्करोग असल्यास डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा प्रस्ताव दिला आहे,” असं रितेश म्हणाला.

हेही वाचा… राखी सावंत रुग्णालयात दाखल; हृदयाशी संबंधित आजारामुळे बिघडली प्रकृती; फोटो व्हायरल

याआधी रितेश माध्यमांसमोर आला होता आणि राखी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करावी, असंही तो म्हणाला होता. “हा काही जोक नाही आहे. राखीनं तिची अशी एक प्रतिमा तयार केलीय की, लोकांना वाटतंय- ती जे करतेय ते सगळं नाटक आहे. राखीची अवस्था खरंच क्रिटिकल आहे. ‘लांडगा आला रे आला’ अशी गत सध्या राखीची झालीय. कोणीच तिच्यावर विश्वास ठेवत नाही आहे. आता, जेव्हा ती खरोखर आजारी आहे तेव्हा काही जणांना असं वाटतंय की, ती कॉन्ट्रोव्हर्सी करतेय; तर काही काही जणांना वाटतंय की ती नाटक करतेय. जे तिला खरंच ओळखतात, त्यांनी कृपया ती लवकरच बरी होईल, अशी प्रार्थना तिच्यासाठी करावी,” असं रितेश म्हणाला होता.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अदिल खानच्या आधी राखीनं रितेशशी लग्न केलं होतं. या दोघांनी ‘बिग बॉस १५’ मध्ये सहभाग घेतला होता; पण काही कारणांमुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये शो संपल्यानंतर ते दोघं लगेचच वेगळे झाले.