अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती आदिल खानच्या अफेअर असल्याचा खुलासा केल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आदिलला ओशिवारा पोलिसांनी अटक केली होती. आदिलवर म्हैसूरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याची म्हैसूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

आदिलच्या अटकेनंतर या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. आदिलच्या अफेअरचा खुलासा केल्यानंतर राखीने त्याच्या गर्लफ्रेंडचं नावही जाहीर केलं होतं. त्याचे अनेक अफेअर असल्याचंही राखी म्हणाली होती. याशिवाय राखीने त्याच्यावर फसवणूक व मारहाण केल्याचे गंभीर आरोपही केले होते. आता राखीने आदिलला बायसेक्शुअल म्हटलं आहे. राखीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने आदिलबाबत अनेक खुलासे केले आहेत.

हेही वाचा>> Selfiee Box Office: अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ ठरला फ्लॉप; १५० कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

“आदिल खानच्या डोक्यावर केस नाहीत, हे मला माहीत नव्हतं. तो टकला आहे, याची माहिती मला हेअर अॅण्ड स्कीन फॅक्टरीने दिली आहे. हे ऐकून मला धक्का बसला आहे. तो बायसेक्शुअल आहे, हेही मला आताच समजलं आहे. त्याचा एक न्यूड व्हिडीओही काहीच दिवसांपूर्वी मी पाहिला. इतका घाणेरडा व्हिडीओ होता”, असं राखी म्हणाली आहे. आदिल खानच्या अटकेनंतर राखी आता शूटिंगमध्ये व्यग्र झाली आहे. राखी लवकरच नवीन गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा>> “…अन् मी शाहरुख खानला १७ वेळा धडकले”, प्राजक्ता माळीने सांगितला ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिल खानला ७ फेब्रुवारीला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला न्यायालयाने आदिलची रवानगी चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत केली होती. त्यानंतर २० फेब्रुवारीला पुन्हा आदिलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.