Raqesh Bapat and Riddhi Dogra: अभिनेता राकेश बापट हा त्याच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकतेच शमिता शेट्टीने राकेश बापटबरोबरच्या ब्रेकअपबद्दल वक्तव्य केल्याने अभिनेता चर्चेत आला होता.

राकेश बापट अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या खासगी आयुष्यातील काही फोटो, व्हि़डीओ शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने सितार वाजवल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. त्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.तसेच श्री गणेशाची मूर्ती बनवण्याचे त्याचे काही व्हिडीओ पाहायला मित आहेत.

राकेश बापटने केले बाप्पाचे विसर्जन

आता अभिनेत्याने सोशल मीडियावर गणपती विसर्जनाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहेत. पहिल्या फोटोत अभिनेता गणपती बाप्पाची आरती करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तो गणपतीच्या मूर्तीला घराबाहेर घेऊन जाताना दिसत आहे. त्यानंतरच्या फोटोत तो कुटुंब व मित्र परिवारासह गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये तो प्रेमाने बाप्पााला निरोप देताना दिसत आहे. तसेच, पुढच्या काही फोटोंमध्ये त्याने कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये त्याची एक्स पत्नी रिद्धी डोगरादेखील दिसत आहे. तर एका फोटोमध्ये गणपतीची मूर्ती ज्या पाटावर ठेवली होती, त्या पाटावर राकेशची मांजर मिया बसली असल्याचे पाहायला मिळत आहे. राकेशने हे फोटो शेअर करताना “गुड बाय गणू, पुढच्या वर्षी भेटू”, अशी कॅप्शन दिली आहे.

राकेशच्या या पोस्टवर रिद्धी डोगराने मांजराचा फोटो पाहून मिया असे लिहित त्यापुढे हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनीदेखील कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

एकाने लिहिले, “रिद्धीबरोबर जसे तुझे नाते आहे, ते मला खूप आवडते. तुम्ही कायम एकमेकांना पाठिंबा देता”, “राकेश आमचं तुझ्यावर प्रेम आहे”, “गणपती बाप्पा मोरया”, “तुला खूप यश मिळो”, “किती छान”, “श्री गणेशाचा आशीर्वाद कायमच तुझ्याबरोबर राहू दे. चांगल्या लोकांबरोबर कायम चांगल्याच गोष्टी घडतात”, “शेवटचा फोटो खूप वेगळा आहे”, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे.

रिद्धी डोगरा व राकेश बापट यांनी २०१९ साली घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. याबद्दल रिद्धीने एका मुलाखतीत वक्तव्यदेखील केले होते. आजही ते एकमेकांच्या मदतीला धावून जातात.

रिद्धीच्या कामाबद्दल बोलायचे तर ती वेब सीरीज, चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तिने जवान चित्रपटात शाहरुख खानबरोबरदेखील स्क्रीन शेअर केली आहे. आता आगामी काळात ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान राकेश बापटने याआधी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तो नुकताच नवरी मिळे हिटलरला या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसला होता.