Marathi TV Actresses Dance Video : मराठी अभिनेते, अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसतात. या फोटो-व्हिडीओला चाहत्यांकडूनही तितकाच चांगला प्रतिसाद मिळतो. या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही कलाकार मंडळी त्यांच्या आयुष्यातील काही खास प्रसंगं, आठवणी किंवा गंमतीजमती शेअर करत असतात
अशातच स्टार प्रवाहच्या मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियावर त्यांचा एक धमाल डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा हा अतरंगी डान्स चाहत्यांनासुद्धा तितकाच आवडला आहे. स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेत्री रुपल नंद (अंजली राजेशिर्के), सुरभी भावे (वल्लरी पाटील) आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस (सुभद्रा पाटील) यांनी डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
‘नवरा माझा नवसाचा’ या लोकप्रिय चित्रपटातील ‘आम्ही कांचो’ या गाजलेल्या गाण्यावर या तिघींनी अतरंगी डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील हे रॅप अजूनही अनेक रसिकांचं आवडतं आहे. चित्रपटात जॉनी लिव्हर यांनी या रॅपवर खास सादरीकरण केलं होतं. आजही हे गाणं अनेकजण एन्जॉय करतात. अशातच मराठी अभिनेत्रींनीसुद्धा या गाण्यावर मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, या व्हिडीओला चाहत्यांबरोबर कलाकारांनीसुद्धा लाईक आणि कमेंटद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. याच मालिकेतील राकेश म्हणजेच अभिनेता आशुतोष गोखलेनेही “प्रसिद्ध आहेत रिल” अशी मजेशीर कमेंट केली आहे आणि त्याने रुपल नंदला टॅगही केलं आहे. तसंच सगळ्यांचा लाडका राया म्हणजेच विशाल निकमनेही या व्हिडीओवर हसण्याच्या इमोजीद्वारे कमेंट केली आहे.
दरम्यान, मालिकेत सुरभी (वल्लरी पाटील) आणि रुपल (अंजली भोसले) यांच्यात कायमच वादविवाद होतानाचे दाखवलं आहे. तर सध्या आजी (सुभद्रा पाटील)सुद्धा आपल्या लेकीच्या विरोधात वागतानाचे पाहायला मिळत आहे. मात्र ऑफस्क्रीन या तिघींचा बॉण्ड खूपच छान असल्याचं या व्हिडीओमधून दिसत आहे.
‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेच्या कथानकाबद्दल बोलायचं झालं तर सध्या अर्णवला त्याचा जिजू म्हणजेच राकेश भोसलेचं सत्य माहीत झालं आहे आणि तो हे सत्य बहिणीला सांगणार आहे. आता यामुळे मालिकेत काय नवा ट्विस्ट येणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.