‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोची लोकप्रियता प्रचंड आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच या शोचे चाहते आहेत. या शोमधून अनेक कलाकारांनं स्वतःची वेगळी ओळख मिळाली आहे. या शोच्या सेटवरील अनेक किस्से सोशल मीडियावर चर्चेत असतात. एवढंच नाही तर या शोमधील कलाकाराचे व्हिडीओ, फोटो आणि सोशल मीडिया पोस्टही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. आता विनोदवीर समीर चौघुले यांच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं आहे.

समीर चौघुले आणि त्यांच्या टीमने अलिकडेच “जिया जले जान जले…” या गाण्याचं एक स्कीट सादर केलं होतं. या स्कीटमध्ये समीर चौघुले या गाण्याचं स्वतःचं एक वेगळंच व्हर्जन गाताना दिसले होते. याच गाण्यावर आता त्यांची चाहती असलेल्या एका चिमुकलीने भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा- “माझ्या नसलेल्या मोठ्या घराचे…” खोट्या बातम्या देणाऱ्या न्यूज पोर्टल्सवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौगुले संतापले

आपल्या स्कीटमध्ये समीर चौघुले “जिया जले…” हे गाणं म्हणताना त्यातील तमिळ व्हर्जनच्या जागी ‘मांजर उंदीर पकडिंगो’ असं म्हणताना दिसले होते. आता हेच गाणं ती चिमुरडी तिच्याच क्यूट अंदाजात गाताना दिसत आहे. रिया बोरसे असं तिचं नाव असून ती कॅनडामध्ये राहते. रियाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक मराठी सेलिब्रेटीं आणि युजर्सनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा- सिद्धार्थ- कियारा रिसेप्शनमधील ‘त्या’ व्हिडीओमुळे आलिया होतेय ट्रोल, नेटकरी म्हणाले, “स्वतःच्या लग्नात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान समीर चौघुले एक उत्कृष्ट अभिनेता आहेत. आपल्या अफलातून विनोदी अभिनय शैलीने ते प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. त्यांनी मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. समीर चौघुलेंचा चाहता वर्ग मोठा असून ते सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. समीर चौघुले ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हवाहवाई’ चित्रपटात दिसले होते. ‘चंद्रमुखी’ चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.