Savalyachi Janu Savali fame actresses: सोशल मीडियामुळे कलाकारांच्या आयुष्याबाबत जाणून घेणे चाहत्यांसाठी सोपे झाले आहे. त्यामुळे कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट, रील्सलादेखील चाहते भरभरून दाद देताना दिसतात.
पडद्यावर अनेक पात्रे एकमेकांविरोधात असल्याचे पाहायला मिळते. ती एकमेकांविरोधात कटकारस्थान करताना दिसतात. मात्र, सोशल मीडियावर कलाकारांमध्ये ऑफस्क्रीन बॉण्डिंग कसे आहे, हे अनेकदा पाहायला मिळते.
प्राप्ती रेडकरने शेअर केला व्हिडीओ
‘सावळ्याची जणू सावली‘ या मालिकेतील तारा, सावली, भैरवी व तिलोत्तमा या एका रीलमध्ये एकत्र दिसत आहेत. ‘मन तुझं जलतरंग…’ ट्रेडिंग गाण्यावर त्या विविध हावभाव करीत मजा करताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी सावली मजेशीर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ मालिकेत सावलीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राप्ती रेडकरने शेअर केला. ‘आम्ही समांतर जगामध्ये’, अशी कॅप्शन तिने दिली आहे. तारा ही भूमिका अभिनेत्री भाग्यश्री दळवीने साकारली आहे. तिलोत्तमाच्या भूमिकेत सुलेखा तळवलकर दिसत आहेत; तर भैरवी ही भूमिका मेघा धाडेने साकारली आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. मेघा धाडेने रीलमधील सावलीचा अभिनय पाहून सावली, असे लिहित हसण्याच्या इमोजी कमेंटमध्ये शेअर केल्या आहेत. तर भाग्यश्रीने प्राप्ती, असे कमेंटमध्ये लिहिले आहे. कलाकारांबरोबर अनेक चाहत्यांनीदेखील या व्हिडीओवर कमेंट्स करीत या अभिनेत्रींचे कौतुक केले आहे.


“वाह! सावली भारीच”, “सावली क्यूट आहे”, “तिलोत्तमाने खूप सुंदर हावभाव केले आहेत”, “सावली आणि तिलोतमा नितांत सुंदर”, “संपूर्ण रील चांगली आहे. पण, व्हिडीओच्या शेवटी सावलीचा जो डान्स आहे, तो खूप छान आहे”, “प्राप्ती, शेवटी तू जे काही केलंस, त्यामुळे खूप हसायला आलं”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. काहींनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.


सावळ्याची जणू सावली या मालिकेबद्दल बोलायचे, तर सावली व सारंग यांच्यातील नाते दिवसेंदिवस दृढ होताना दिसत आहे. तर, तारा व ऐश्वर्या हे सावलीला त्रास देण्यासाठी सतत कारस्थाने करताना दिसतात. तिलोत्तमाने अजूनही सावलीला तिची सून म्हणून मान्य केलेले नाही. आता आगामी काळात सावली तिलोत्तमाचे मन जिंकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.