Savalyachi Janu Savali upcoming twist: सध्या टेलिव्हिजनवर अशा अनेक मालिका आहेत, ज्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहेत. विविध वाहिन्यांवरील विविध जॉनरच्या, अफलातून कथा असलेल्या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत.
या सगळ्यात झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेतील तिलोत्तमा, भैरवी, ऐश्वर्या, तारा, सावली, सारंग, सोहम, जगन्नाथ आणि इतर सर्वच पात्रे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करीत आहेत. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
झी मराठी वाहिनीने सावळ्याची जणू सावली या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सावलीला जगन्नाथचा फोन येतो. जग्गनाथ सावलीला सावध करतो. जगन्नाथ म्हणतो, “सावली,मी तुला ज्या संकटाबद्दल बोललो होतो. ते संकट अगदी दाराशी येऊन उभं आहे.” त्यावर सावली जगन्नाथला म्हणते, “संकट? अहो पण आज तर खूप आनंदाचा दिवस आहे.”
जगन्नाथ तिला समजावत सांगतो, “मला माहीत आहे. मी बातम्या बघितल्या. सारंगला खूप मोठा पुरस्कार मिळाला आहे. सावली तुझ्या सौभाग्यावर संकट येणार आहे.” जगन्नाथचे बोलणे ऐकल्यानंतर सावलीच्या चेहऱ्यावर चिंता दिसते. त्यादरम्यान, एक मुलगी गाडीतून उतरल्याचे दिसते. ती सारंगचा फोटो असलेला पेपर जाळत असल्याचे दिसते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, सावलीच्या सौभाग्यावर संकटाची छाया, अशी कॅप्शन दिली आहे. आता सावली सारंगचे कसे रक्षण करणार, सारंगवर संकट येणार म्हणजे नेमके काय होणार, नवीन मुलीच्या येण्याने सावली व सारंगच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार, तिलोत्तमा आणि इतर मेहेंदळे कुटुंबीय या सगळ्याचा कसा सामना करणार, सावलीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी जगन्नाथ आणि देवा तिला कशी मदत करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याआधी समोर आलेल्या प्रोमोमध्ये मालिकेत अभिनेत्री मानसी कुलकर्णीची एन्ट्री होणार असल्याचे पाहायला मिळाले. मानसी नुकतीच थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत दिसली होती. नुकताच या मालिकेने निरोप घेतला आहे. आता या मालिकेतूनदेखील मानसी प्रेक्षकांची मने जिंकणार का, तिची नेमकी भूमिका काय असणार हे आगामी काळात पाहायला मिळेल.