Savalyachi Janu Savali Upcoming Twist: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील सारंग व सावलीची मैत्री कायमच प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसते. त्यांच्या मनाविरुद्ध झालेल्या लग्नानंतरही त्यांच्यात चांगली मैत्री झाल्याचे पाहायला मिळाले.

काही दिवसांपूर्वीच अस्मीने सारंग व सावलीला एकमेकांपासून दूर करण्यासाठी कारस्थान रचले होते. सारंगच्या जीवाला धोका आहे, जर सावलीने घटस्फोटाच्या पेपरवर सही केली नाही तर सारंगच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सावलीने घटस्फोटाच्या पेपरवर सह्यादेखील केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर तिलोत्तमाने सारंगचे लग्न अस्मीबरोबर ठरवले. त्याचदरम्यान सावलीला अस्मीच्या योजनेबाबत समजले. तिने अस्मीचे सत्य सर्वांसमोर सांगण्याचा निर्णय घेतला.

सारंग सर्वांसमोर देणार प्रेमाची कबुली

आता ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले की, सावली व सारंग पुन्हा लग्नगाठ बांधत आहेत. याचवेळी सारंग सगळ्यांसमोर हे सांगतो की माझं सावलीवर प्रेम आहे. तसेच तो तिलोत्तमाची हात जोडत माफी मागतो व म्हणतो की, “तुला दिलेलं वचन मी पाळू शकलो नाही. ” पुढे तो सावलीसमोर गुडघ्यावर बसून म्हणतो, “सावली माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझ्याबरोबर आयुष्यभर राहायचं आहे, लग्न करशील माझ्याशी? “, त्यावर सावली हसताना दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “विठुरायाच्या आशीर्वादाने आणि देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने पुन्हा बांधली जाणार सावली-सारंगची लग्नगाठ”, अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सारंगचे कौतुक केले आहे. तसेच हा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता तिलोत्तमा सावलीला सून म्हणून स्वीकारणार का, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.