‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वात फिनालेपर्यंत पोहोचलेले अर्चना गौतम व शिव ठाकरे, तसेच सुंबूल तौकीर खान लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. होय, शो संपल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यांनी हे तिघेही एकत्र एकाच शोमध्ये दिसतील. यासंदर्भात रुबीना दिलैकने एक पोस्ट शेअर केली आहे.

आधी नीतू कपूरनी रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सना लगावला टोला; आता कतरिनाच्या आईने दिलं उत्तर? पोस्ट चर्चेत

रुबीना दिलैकने इंस्टाग्रामवर तीन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती हर्ष लिंबाचिया, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशसोबत दिसत आहे. भारती सिंगचा पती या तिघांवर लक्ष ठेवून आहे. त्याचबरोबर हे सर्वजण काही ना काही टास्क करताना दिसत आहेत. यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये रुबीना सोफ्याच्या हँडलवर बसलेली आहे. तिथे तिच्या डाव्या बाजूला अर्चना गौतम आणि शिव ठाकरे उभे आहेत. तर उजवीकडे हर्ष लिंबाचिया आणि पुनित पाठक हे दोघेही वाद घालताना दिसत आहेत.

परिणीती चोप्राशी लग्नाच्या चर्चा; खासदार राघव चड्ढांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले, “तुम्हाला सेलिब्रेशन…”

तिसऱ्या फोटोमध्ये रुबीना दिलैकचा एक हात पुनीत पाठक आणि दुसरा हात अर्जुन बिजलानीने धरला आहे. तिघेही हसत आहेत. हर्ष लिंबाचिया आणि सुंबुल तौकीर खान धक्कादायक प्रतिक्रिया देत आहेत. तर शिव ठाकरे आणि अर्चना गौतम तोंड पाडून उभे आहेत. या फोटोंसोबत रुबिनाने कॅप्शन लिहून याबद्दल माहिती दिली.

रुबीना दिलैकने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ही टॉर्चरची वेळ आहे. (हास्य आणि विनोदांसह.) हाऊसफुल बे-बी सोमवार ते रविवार म्हणजे सातही दिवस रात्री 10 वाजता कलर्स टीव्हीवर प्रसारित होईल. या शोचे नाव ‘एंटरटेनमेंट की रात हाऊसफुल’ असं असेल. ज्यामध्ये सेलेब्स येतील आणि त्यांच्यासोबत काही मजेदार टास्क केले जातील. हा शो १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बिग बॉस संपल्यानंतर शिव ठाकरे, सुंबूल तौकीर खान व अर्चना गौतम तिघेही एकत्र दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या शोबद्दल खूप उत्सुकता आहे.