अनेकदा आपल्या जवळच्या नात्यांमध्ये काही गोष्टींमुळे गैरसमज निर्माण होताना दिसतात. त्यामुळे वाद-विवाद, दुरावा निर्माण होतो. मालिकांमध्येदेखील असे काही प्रसंग पाहायला मिळतात. प्रेक्षकांनादेखील आपल्या आवडत्या पात्रांच्या आयुष्यात नेमके काय होणार, याची उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. आता झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘शिवा'(Shiva) ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे.

आशू शिवाविषयी प्रेम व्यक्त करत म्हणाला…

शिवा व आशू यांच्यामध्ये मोठे गैरसमज निर्माण झाले होते. शिवाची बहीण दिव्या व आशूची बहीण कीर्ती यांनी हे गैरसमज निर्माण केले होते. त्यानंतर आशूने शिवाला घराबाहेर जाण्यास सांगितले होते. संधीचा गैरफायदा घेत कीर्ती व सिताई या दोघींनी शिवा व आशूकडून घटस्फोटाच्या पेपरवर सह्या घेतल्या होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी लगेचच आशू व त्याची मैत्रीण नेहा यांचे लग्न ठरवले होते. नेहाने मात्र शिवाच्या सांगण्यावरून लग्नाला होकार दिला होता. कारण- शिवाला विश्वास होता की, आशू त्याचे प्रेम व्यक्त करेल. मात्र, काही दिवसांनंतर आशूने नेहाबरोबरच्या लग्नाला होकार दिला. आता त्याच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. यादरम्यानच काही नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. शिवा मालिकेचा एक प्रोमो समोर आला असून, आशू त्याच्या भावना व्यक्त करणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘शिवा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, किर्ती व तिच्या पतीने शिवा व चंदन यांना मारण्याची सुपारी काही गुंडांना दिली आहे. गुंडांनी त्यांना काही ठिकाणी आणले आहे. त्यांना वाचवण्यासाठी आशू येतो. आशू-शिवा एकत्र मिळून गुंडांना मारतात. शिवाच्या हाताला गोळी लागते. ते पाहताच आशू व चंदन दोघेही तिच्याकडे पळत येतात. आशू तिच्या जखमेवर कापड बांधतो. शिवा आशूला तिथून जाण्याचा सल्ला देते. तितक्यात गुंड पुन्हा त्यांच्यावर हल्ला करतात. त्यावेळी दोघेही एकमेकांचे संरक्षण करतात.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की आशू शिवाला म्हणतो, “शिवा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे.” पुढे तो त्याचे प्रेम व्यक्त करत म्हणतो, “आय लव्ह यू शिवा”, आशूने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्यानंतर शिवा त्याला मिठी मारते. हा प्रोमो शेअर करताना, “आलेल्या संकटाला शिवा आणि आशू एकत्र भिडणार, आशू त्याच्या मनातलं शिवाला सांगणार!”, अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, याआधी प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोमध्ये आशू त्याच्या नेहाबरोबरच्या लग्नाच्या मंडपात शिवाला दिलेल्या घटस्फोटाचे पेपर फाडताना दिसला होता. त्यामुळे मालिकेत नेमकं काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.