टेलीव्हिजनवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘सीआयडी’. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. १९९८ मध्ये ही मालिका सुरू झाली होती. यानंतर २० वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. २०१८ मध्ये ही मालिका बंद करण्यात आली होती. पण, चाहत्यांच्या मागणीमुळे या मालिकेचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला.

काही दिवसांपुर्वी या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची एक्झिट झाल्याचे दाखवण्यात आलं. त्यांच्याऐवजी पार्थ समथानने नवीन एसीपी म्हणून मालिकेमध्ये प्रवेश केला होता. याबद्दल पार्थला प्रेक्षकांच्या अनेक नकारात्मक प्रतिक्रियांचा सामनाही करावा लागला. यानंतर शिवाजी साटम यांच्या अनेक चाहत्यांनी ते मालिकेत पुन्हा परतावे अशी मागणी केली होती.

चाहत्यांच्या वाढत्या मागणीनुसार, ‘सीआयडी २’मध्ये शिवाजी साटम म्हणजेच एसीपी प्रद्युम्न यांची पुन्हा एकदा एन्ट्री होणार आहे. एका मोठ्या ट्विस्टसह ते मालिकेत पुन्हा एकदा परतत आहेत आणि या एन्ट्रीचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. एसीपी प्रद्युम्न यांच्या एन्ट्रीबद्दल प्रोमोखाली चाहत्यांनी याबद्दल आनंदही व्यक्त केला आहे.

शिवाजी साटम यांची मालिकेत एन्ट्री झाली आहे. पण त्यांच्या एन्ट्रीसह एक नवा ट्विस्टसुद्धा येणार आहे, तो म्हणजे त्यांची स्मरणशक्ती गेल्याचा. प्रोमोमधून असं दिसून येत आहे की, एसीपी प्रद्युम्न यांची स्मरणशक्ती गेली आहे आणि ते सहकारी दया यांच्यावर बंदूक धरतात. दया त्यांना ओळख दाखवूनही ते त्याच्यावर गोळी झाडतात. मग जीव वाचवण्यासाठी दया पळून जातो.

एसीपी प्रद्युम्न यांच्या तावडीतून सुटत दया सुरक्षित ठिकाणी जातो आणि इन्स्पेक्टर अभिजीतला एसीपी प्रद्युम्न जीवंत असल्याची माहिती देतो. एसीपी प्रद्युम्न जीवंत असल्याचे कळताच दोघेही आनंदी होतात. शिवाजी साटम यांच्या एन्ट्रीच्या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये “याचा अर्थ एसीपी प्रद्युम्न जीवंत आहेत असं म्हटलं आहे.” तसंच पुढे मालिकेच्या वेळेबद्दलही सांगण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवाजी साटम यांना सीआयडी २’मध्ये पुन्हा एकदा पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एसीपी प्रद्युम्न, हा दिग्गज परत आला आहे. चांगली बातमी,” सीआयडीचे खरे हीरो”, “एसीपी प्रद्युम्न यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत”, “एसीपी प्रद्युम्नमुळे आता सीआयडी बघायला मजा येणार” अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.