‘कसोटी जिंदगी की फेम’ अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचं निधन झालं आहे. ४६व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. जिममध्ये व्यायाम करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. जय भानूशालीसह इतर कलाकारांनी सिद्धांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

‘कुसुम’ या लोकप्रिय मालिकेतून सिद्धांतने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. ‘वारिस’, ‘सूर्यपूत्र कर्ण’, ‘कृष्णा अर्जुन’, ‘कयामत’, ‘विरुद्ध’ या मालिकांमुळे सिद्धांत घराघरात पोहोचला. कसोटी जिंदगी की या मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. जिद्दी दिल माने ना या मालिकेत सिद्धांत शेवटचा झळकला होता. ऑन स्क्रीनप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यामुळे सिद्धांत अनेकदा चर्चेत आला होता.

हेही वाचा >> दहा वर्षांपूर्वी असा दिसायचा फिल्टरपाड्याचा बच्चन, गौरव मोरे स्वत:चाच फोटो शेअर करत म्हणाला…

हेही पाहा >> Photos : ‘या’ अभिनेत्रीमुळे शोएब मलिक आणि सानियाच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाच्या चर्चांनंतर फोटो झाले व्हायरल

सिद्धांतने २००० साली ईरा सुर्यवंशीसह लग्नगाठ बांधली होती. १५ वर्षांनंतर २०१५ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळं झाले. सिद्धांत व ईराला डिजा ही मुलगी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धांतचं त्याची सहकलाकार प्रिया भटीजाबरोबर अफेअर होतं. प्रियामुळेच त्याने पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं.

हेही वाचा >> “किसिंग सीन करताना…” ‘३६ गुण’ चित्रपटातील ‘त्या’ बोल्ड दृश्यांबद्दल संतोष जुवेकरचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धांत २०१७ साली रशियन मॉडेल अलिशिया विवाहबंधनात अडकला. अलिशियाचं हे दुसरं लग्न असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे. सिद्धांत त्याची दुसरी पत्नी अलिशियाच्या मॉडेल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करायचा. तेथील मॉडेलला तो ट्रेनिंग द्यायचा. तिथेच त्यांचे सूत जुळल्यानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.  सिद्धांत हा फिटनेस फ्रिक होता. शरीराकडे तो विशेष लक्ष द्यायचा. त्याने केलेली शेवटची पोस्टही फिटनेसच्या बाबतीतच होती.