‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनतेप्रमाणे मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारमंडळी या कार्यक्रमाचं कौतुक करत असतात. प्रसिद्ध गायिका आनंदी जोशीने नुकतीच हास्यजत्रेच्या कलाकारांसाठी पोस्ट शेअर केली आहे. अलीकडेच संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात आनंदी आणि हास्यजत्रेतील काही कलाकारांची भेट झाली. यानंतर गायिकेने हा खास फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने केलं प्रसाद-अमृताचं केळवण, अभिनेत्रीचा हटके उखाणा ऐकलात का?

गायिका आनंदी जोशी हास्यजत्रेतील कलाकारांसाठी लिहिते, “काल इव्हेंट सुरु होईपर्यंत मी फोनवर हास्यजत्रेचे एपिसोड्स पाहत होते आणि थोड्याच वेळात समोर हे सगळे!! मी या सर्वांची खूप मोठी चाहती आहे. रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रताप…मित्रांनो, तुम्ही सगळे महान आहात.” या पोस्टबरोबर गायिकेने या सर्वांचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : “सिग्नलवर एका तृतीयपंथीयाने…”, विशाखा सुभेदारने सांगितला भावनिक किस्सा; म्हणाली, “एक माणूस म्हणून…”

आनंदी जोशीची ही स्टोरी हास्यजत्रेच्या कलाकारांनी रिशेअर करत गायिकेचे आभार मानले आहेत. एका पुरस्कार सोहळ्यात आनंदी आणि या विनोदवीरांची भेट झाली. सोनी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा सध्या भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा : Video : “तुझे वडील महिन्याभरापूर्वी गेले अन् तू…”, अंकिता लोखंडेला डान्स करताना पाहून चाहते नाराज, व्हिडीओ चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गायिका आनंदी जोशीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच तिने प्रसिद्ध गायक जसराज जोशीसह लग्न केलं. आनंदी ही मराठी सारेगमपची उपविजेती होती, तर जसराज हिंदी सारेगमपचा विजेता ठरला होता.