scorecardresearch

“तुमची जीभ काळी आहे” म्हणत शोमधून काढून टाकलं; स्मृती इराणींनी शेअर केली गरोदरपणातील ‘ती’ कटू आठवण

काही दिवसांपूर्वी स्मृती इराणींनी गर्भपाताबाबतची एक धक्कादायक घटना शेअर केली होती. आता स्मृतीनी गरोदरपणातील एक कटू आठवण सांगितली आहे.

smriti irani
स्मृती इराणींनी शेअर केली गरोदरपणातील कटू आठवण (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी गेल्या काही दिवसांपासून अचानक चर्चेत आल्या आहेत. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे स्मृती इराणी या प्रसिद्धीझोतात आल्या. यात त्यांनी ‘तुलसी विरानी’ ही भूमिका साकारली होती. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नुकतंच स्मृती यांनी आपल्या गर्भपाताबाबतच्या काही कटू आठवणी शेअर केल्या होत्या. आता पुन्हा स्मृती यांनी आपल्या गरोदरपणातील एक कटू आठवण शेअर केली आहे.

हेही वाचा- फोटोत दिसणाऱ्या ‘या’ मुलीला ओळखलंत का? आज आहे आघाडीची मराठी अभिनेत्री

स्मृती इराणी यांनी २००१ मध्ये पारशी उद्योगपती झुबिन इराणीशी लग्न केले. अभिनेत्रीला दोन मुले आहेत. मुलाचे नाव जोहर आणि मुलीचे नाव जॉयश आहे. स्मृती इराणी यांनी अलीकडेच रेडिओ जॉकी नीलेश मिश्रा यांनी घेतलेल्या मुलाखतीत आपल्या गरोदरपणातील कटू आठवण सांगितली आहे. स्मृती त्यावेळेस गौतम अधिकारी यांच्या ‘कुछ दिल से’ या शोमध्ये होस्ट म्हणून काम करत होत्या. गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम केल्यानंतर स्मृती यांना शोमधून अचानक कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं.

हेही वाचा- Video: “शेवट कधीच सोपा नसतो…” स्वप्निल जोशीची भावूक पोस्ट, व्हिडीओ चर्चेत

स्मृती इराणींनी सांगितलं, “माझ्या गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी गौतम अधिकारी यांच्या शोचे शूटिंग करत होते. मी शो होस्ट करायचे. जेव्हा मी २४ किंवा २५ वर्षांची होते. माझ्या पोटात माझा मुलगा होता. त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते, कामात नवीन होते. मी नवव्या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम केले, जेणेकरून मला माझ्या गरोदरपणानंतर सुट्टी घ्यायची होती. दुसर्‍या दिवशी मला सांगण्यात आले – ‘तुला काढून टाकले आहे’ आणि मीता वशिष्ठची हिला घेण्यात आले आहे. त्यांनी गौतम अधिकाऱींना सांगितले की हा शो चालणार नाही कारण मी एपिसोडची स्क्रिप्ट लिहायची. तो शो पहिल्या क्रमांकावर होता कारण मी पटकथा लिहायचे. तुला नवीन अँकर मिळेल, पण स्क्रिप्ट रायटर कुठून मिळणार?” मात्र, स्मृतींना शोमधून काढल्यानंतर तो शो जास्त दिवस चालला नव्हता.

हेही वाचा- “नशिबाच्या पानावर माझ्यासाठी…” लंडनला गेलेल्या कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर समीर चौघुलेंची कमेंट, म्हणाले, “तू आयुष्यातल्या…”

स्मृती इराणी यांनी सांगितले की, ती निघताच शो खूप लवकर बंद झाला. अभिनेत्री म्हणाली, “मी शो सोडताच तो लवकरच बंद झाला. लोक म्हणतात की माझी जीभ काळी आहे, पण त्या शोमध्ये मी काय करत होते हे मला माहीत होतं. नुकतंच स्मृतींनी आपल्या गर्भपाताबाबतची धक्कादाय घटना सांगितली होती. स्मृती एकता कपूरच्या “क्यूकी..” चे शुटींग करत होत्या आणि त्या गरोदर होत्या. तरीही त्यांच्याकडून डबल शिफ्ट करुन घेतली जायची. एक दिवस त्यांना सेटवरच जास्त त्रास होत होता. त्या डॉक्टराकडे गेल्या तेव्हा त्यांना कळलं त्यांचा गर्भपात झाला आहे. मात्र, गर्भपाताच्या दुसऱ्याच दिवशी एकताने स्मृतीला कामाला येण्यास सांगितले होते. तेव्ह स्मृतींना आपल् वैद्यकीय अहवाल दाखवावा लागला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 16:33 IST

संबंधित बातम्या