सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मालिका, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. ‘क्लासमेट’, ‘मितवा’, ‘हिरकणी’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये सोनालीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच अभिनेत्रीने नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकरसह ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘सारेगमप’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी सोनालीने ‘आई’साठी खास कविता सादर केली.

हेही वाचा : रोमँटिक कवितांवरून हिणवणाऱ्यांना किशोर कदम यांचं स्पष्ट उत्तर; म्हणाले “प्रत्येक माणूस…”

mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
Saleel Kulkarni Shared special post for son shubhankar kulkarni
“आमच्या शुभूने…”, सलील कुलकर्णींची मुलासाठी खास पोस्ट; त्याचं पहिलं हिंदी गाणं येतंय श्रोत्यांच्या भेटीला
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Purshottam Berde Reaction on sharad ponkshe and nana patekar trolling
“मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच…”, शरद पोंक्षेंच्या ट्रोलिंगबद्दल पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं मत; नाना पाटेकरांबाबत म्हणाले…

सोनालीने ‘सारेगमप’च्या मंचावर “आई, थकत कशी नाहीस गं तू?” या विषयावर कविता सादर केली. या कवितेद्वारे अभिनेत्रीने आईची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आई दिवसभरात आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी किती काम करते आणि एवढं काम करूनही ती थकत का नाही? असा गोड सवाल सोनालीने या कवितेमार्फत उपस्थित केला आहे.

सोनालीने सादर केलेली कविता

“आई, थकत कशी नाहीस गं तू?”

सूर्य उगवण्याआधी दिवसाची सुरुवात करतेस तू, चंद्र नभी आला तरी थकत कशी नाहीस गं तू?
ऑफिसच्या कामातही मुलांची आठवण काढतेस तू, जबाबदारीचं ओझं पेलून थकत कशी नाहीस गं तू?
दमून भागून घरी आल्यावर पसारा बघून चिडतेस तू, भांडता-भांडता आवरताना थकत कशी नाहीस गं तू?
घर-कुटुंब सर्वांची तुला नेहमीच असते आस, आमच्यासाठी झटतेस तू १२ महिने २४ तास
मग अशावेळी विचारवं वाटतं थकत कशी नाहीस गं तू?
प्रश्नाचं उत्तर देतानाही कोणत्या तरी कामात व्यस्त असते तू
आज मात्र शिणलेल्या डोळ्यांना थोडा आराम दे…
पण, आधी एका प्रश्नाचं उत्तर दे तू, थकत कशी नाहीस गं तू?

हेही वाचा : दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून ‘सुभेदार’च्या टीमचं व अजय पुरकरांचं कौतुक; अभिनेत्याने शेअर केला खास व्हिडीओ

सोनाली कुलकर्णीने ‘सारेगमप’च्या मंचावर ही कविता सादर केल्यावर सर्वांनी तिचं कौतुक केलं. हा व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. दरम्यान, अलीकडेच अभिनेत्री ‘डेट भेट’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लवकरच तिचा बहुचर्चित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.