बिग बॉस १६ ची स्पर्धक सौंदर्या शर्माला अनेकदा तिच्या रिलेशनशिपबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. सुरुवातीला तिचं नाव अभिनेता गौतम विजशी जोडलं गेलं होतं. पण शोमधून बाहेर पडल्यानंतर सौंदर्या शर्मा दिग्दर्शक साजिद खानला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. मागच्या काही दिवसांपासून या दोघांच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर सौंदर्याला यावरून ट्रोल केलं जात आहे आणि तिला काही लोकांना गोल्ड डिगरही म्हटलं आहे. आता या सर्व मुद्द्यांवर सौंदर्याने मौन सोडलं आहे.

नुकत्याच ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सौंदर्या शर्माने साजिद खानशी तिचं नाव जोडलं जाण्यावर भाष्य केलं. ती म्हणाली, “आजकालचा काळ खूपच चुकीचा आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर उभे असलेले दिसलात तरीही त्या व्यक्तीशी तुमचं नाव जोडलं जातं. लोक विसरले आहेत की त्यांनी मला बिग बॉसच्या घरात असताना लहान बहीण असं म्हटलं होतं. त्यांची बहीण फराह खान यांना भेटणंही एखाद्या फॅमिली मेंबरला भेटण्यासारखं होतं. पण लोकांचे असे आरोप मनाला दुखावतात.”

आणखी वाचा- “फॅशनच्या नादात लग्न…”, अवॉर्ड सोहळ्यातील ‘त्या’ व्हिडीओमुळे कियारा आडवाणी ट्रोल

सौंदर्या पुढे म्हणाली, “माझ्या कुटुंबालाही या सगळ्या गोष्टींमुळे त्रास होतोय. मी त्यांच्याबरोबर अगोदर कधीच काम केलं नव्हतं. मी फक्त त्यांना बिग बॉसमुळे ओळखते. हे सगळं माझ्यासाठीच नाही तर साजिद खान यांच्यासाठीही मन दुखावणारं आहे. शेखर सरांच्या पार्टीमध्ये जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा आम्ही असा विचार करत होतो की पुढच्या वेळी सर्वांच्या समोर त्यांना राखी बांधावी. जेणेकरून अशा गोष्टी पुन्हा बोलल्या जाणार नाही. बाकी मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगेन की अशा अफवांवर लक्ष देऊ नका. ते माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. त्यामुळे अशा अफवा पसरवणं थांबवा.”

आणखी वाचा- Bigg Boss 16 मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर साजिद खानचं अफेअर? नाव समोर येताच म्हणाली, “मी त्यांच्याकडे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय ट्रोलिंगबद्दल बोलताना सौंदर्या शर्मा म्हणाली, “माझ्यावर टीका करणाऱ्यांची संख्या तर कमीच आहे. पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची संख्या त्याहून जास्त आहे. पण तरीही त्या सर्व टीका करणाऱ्यांचे मी आभार मानते कारण त्यांनी हे सर्व करून मला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांना फक्त एकच सल्ला आहे की थोडा सकारात्मक विचारही करा.”