Hiba Trabelssi ही ‘स्प्लिट्सव्हिला १४’मुळे सर्वांच्या परिचयाची झाली. या स्पर्धेतील तिच्या कामबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक गोष्ट तिने उघड केली आहे. भारतात येऊन मनोरंजन सृष्टीत काम मिळविताना तिला कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल भाष्य करताना ती मानवी तस्करीची बळी ठरली होती असा गौप्यस्फोट तिने केला आहे.

मॉडेल असलेल्या हिबाने ‘स्प्लिट्सव्हिला १४’मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. सध्या ती या कार्यक्रमात झळकत आहे. त्याआधी एका चित्रपटात तिने कतरिना कैफची बॉडी डबल म्हणूनही काम केलं होतं. पण हा इथवरचा प्रवास खूप कठीण होता.

आणखी वाचा : अभिनयापाठोपाठ आता सुनील ग्रोव्हरने सुरू केला दूधविक्रीचा व्यवसाय? फोटो शेअर करत म्हणाला…

खुलासा करत हिबा म्हणाली, ”जेव्हा मी भारतात येऊन मॉडेलिंग करायला सुरुवात केली तेव्हा माझा मोठा विश्वासघात झाला होता. तेव्हा मी हादरले होते. मी मानवी तस्करीची बळी ठरले होते आणि मला हे माहितच नव्हतं. तो माझ्या आयुष्यातील भीतीदायक काळ होता. ज्या व्यक्तीवर मी पूर्ण विश्वास दाखवला होता त्यानेच माझा विश्वासघात केला.”

हेही वाचा : सनी लिओनीने कपड्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तू माझ्या कपड्यांबरोबर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “ते लोक माझ्याशी माणुसकी सोडून वागले. यांनी मला किडनॅप केलं गेलं आणि एका खोलीत अन्न-पाणी न देता मला तीन दिवस बंद केलं होतं. पण मी हार मानली नाही आणि स्वतःला तिथून बाहेर काढलं. या घटनेने मी खूप घाबरले होते. पण त्याच अनुभवाने मला खूप बळ दिलं,मला खूप काही शिकवलं आणि आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. पण त्या घटनेनं माझ्या मानसिक आणि शरीरावर आरोग्यावर खूप वाईट परिणाम झाला. पण आता ‘स्प्लिट्सव्हिला १४’मध्ये सहभागी होऊन मी खूश आहे आणि आता सगळ्या चांगल्या गोष्टी घडतील अशी मी आशा करते.” तिने सांगितलेल्या या अनुभवाने सर्वांनाच धक्का बसला आहे.