Star Pravah Serial TRP Updates : अलीकडच्या काळात प्रत्येक वाहिनीवर टीआरपीच्या दृष्टीकोनातून अनेक बदल करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या दोन लोकप्रिय मालिकांनी गेल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकांच्या जागी आता वाहिनीवर दोन नव्या मालिका सुरू झालेल्या आहेत.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेच्या अंतिम भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं टीआरपीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. टीआरपीच्या यादीत शिवानी सुर्वेची ही मालिका ३.८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानी आहे. या मालिकेने १२ सप्टेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतला.
मात्र, यंदा टीआरपीच्या यादीत एक मोठा बदल झालेला आहे. पहिल्या स्थानी नेहमीप्रमाणे सायली-अर्जुनची ‘ठरलं तर मग’ मालिका आहे. पण, दुसऱ्या स्थानासाठी तीन मालिकांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘तू ही रे माझा मितवा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या तीन मालिका ३.८ रेटिंगसह या आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी आहेत.
‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत गेल्या आठवड्यात अर्णव-ईश्वरीच्या लग्नाचा ट्रॅक सुरू होता. त्यामुळे रात्री १०:३० च्या उशिराच्या स्लॉटला सुद्धा या मालिकेला खूप चांगला टीआरपी मिळाला आहे. याशिवाय टीआरपी चार्टमध्ये या मालिकेने थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
स्टार प्रवाहच्या मालिकांचा टीआरपी
१. ठरलं तर मग
२. थोडं तुझं आणि थोडं माझं
तू ही रे माझा मितवा
घरोघरी मातीच्या चुली
३. लक्ष्मीच्या पाऊलांनी
४. कोण होतीस तू काय झालीस तू
५. लग्नानंतर होईच प्रेम
६. येड लागलं प्रेमाचं

दरम्यान, या आठवड्यात वाहिनीवर ‘लपंडाव’ आणि ‘नशीबवान’ या दोन नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. आता या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पुढील आठवड्याच्या टीआरपी चार्टवरून स्पष्ट होईल.