मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सुकन्या मोने यांना ओळखले जाते. गेली अनेक वर्ष त्या आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकत आहेत. सध्या ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई’ या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सुकन्या मोने या त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या साधेपणामुळे आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ही नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी पिंपल घालवण्यासाठी एक सोपी टीप सांगितली आहे.

सुकन्या मोने नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी, शूटिंगदरम्यान घडणाऱ्या गमती जमती चाहत्यांची शेअर करत असतात. त्याचबरोबर मनोरंजन सृष्टीतील इतर कलाकारांच्या पोस्टवर कमेंट्स करत त्या त्यांच्या पोस्टबद्दलचं मत व्यक्त करत असतात. आता क्रांती रेडकरने शेअर केलेल्या एका व्हिडीओवर कमेंट करत सुकन्या मोने यांनी पिंपल दोन दिवसात घालवण्यासाठी एक टीप सांगितली आहे.

आणखी वाचा : “आज तू सातासमुद्रापार…” लेकीच्या वाढदिवशी सुकन्या मोने भावूक, पोस्ट चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रांती रेडकरचे रील्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अगदी विनोदी शैली दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोडी ती त्या रिल्सच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते. तिने नुकतंच एक रील शेअर केला होतं. त्या रीलमधून तिने पिंपल्सबद्दलचं दुःख व्यक्त केलं. पिंपल गेला तरीही त्याचा डाग अनेक दिवस राहतो असं ती रीलमध्ये म्हणाली होती. या व्हिडीओवर कमेंट करत सुकन्या मोने यांनी साधी सोपी घरगुती टीप सांगितली. त्यांनी लिहिलं, “एक मिरी उगाळून थोडीशी लावायची पिंपलवर, एका दिवसात जाते.”

हेही वाचा : Video: नाचता नाचता स्टेजवरून खाली पडला कुशल बद्रिके, ‘चला हवा येऊ द्या’मधील व्हिडीओ व्हायरल

त्यांनी दिलेली ही टीप खूप चर्चेत आली आहे. या कमेंटवर अनेकांनी लाईक देऊन ही टीप उपयोगी असल्याचं म्हटलं.