‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राची घराघरांत एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मालिकेत काही वर्षांचा लीप येण्याआधी गौरी, जयदीप, शालिनी, उदय, माई या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस करत बांधून ठेवलं होतं. यापैकी उदयची भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील आता खऱ्या आयुष्यात बाबा झाला आहे. होळीच्या दिवशी अभिनेत्याच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालं आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या संजय पाटीलला कन्यारत्न झालं आहे. सोशल मीडियावर गोड असा फोटो शेअर करत त्याने ही आनंदाची बातमी त्याने आपल्या चाहत्यांना दिली आहे. यामध्ये अभिनेत्याने बायकोसह चिमुकल्या लेकीचा हात हातात घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

“काल होळी पौर्णिमा साजरी झाली…आमच्या आयुष्यात साजिरी गोजिरी परी आली…It’s a baby girl” असं कॅप्शन देत संजयने मुलगी झाल्याची गुडन्यूज त्याच्या चाहत्यांना दिली आहे. काही महिन्यांपूर्वी संजयने बायकोच्या डोहाळेजेवणाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.

हेही वाचा : “१२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी…”, सुप्रिया पिळगांवकरांची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संजयची बायको अबोली देखील लोकप्रिय लेखिका आहे. सध्या अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. याशिवाय त्याने शेअर केलेल्या पोस्टवर अश्विनी कासार, गिरीजा प्रभू, मिनिक्षी राठोड या अभिनेत्रींनी कमेंट्स करत संजयचं अभिनंदन केलं आहे.