Madhavi Nimkar Talks About Girija Prabhu : माधवी निमकर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेत तिनं शालिनी ही भूमिका साकारत तिच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकंलेली. अशातच आता तिनं यातील तिची सहकलाकार गिरीजा प्रभूबद्दल सांगितलं आहे
माधवीनं नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिनं ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेबद्दल सांगितलं आणि त्यादरम्यानच्या आठवणीही सांगितल्या आहेत. यावेळी तिला “कधी असं झालंय का की, कठोर किंवा कठीण सीन करताना वूक झालीस?” असा प्रश्न विचारण्यात आला होता.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सेटवर सीन करताना गिरीजा प्रभूला झालेली दुखापत
माधवी निमकर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली, “हो असं झालं आहे. त्यावेळी गिरीजाला म्हणजेच मालिकेत गौरीला खूप छळलंय. तेव्हा आम्ही ऑफस्क्रीन खूप हसायचो. तिला हात धरून वगैरे खूप छळलं आहे. आता आठवलं किंवा टीव्हीवर कधी दिसलं की, असं वाटतं की काय करायला लावलं आहे. असंच एकदा मालिकेच्या सुरुवातीलाच वाटतं. ती लग्नाच्या लूकमध्ये होती तेव्हा सीन करताना मी तिचा गाल धरला. तेव्हा तिनं झुमके घातले होते, त्या झुमक्याची जी काठी होती, ती तिला रुतली. मी गाल धरताना चुकून माझ्या हातात तो झुमकाही आला तेव्हा सीन करताना मला अंदाज आला होता की, हिला काहीतरी झालं आहे. पण वाटलं की, सीनसाठी खरोखर डोळ्यांत पाणी येत असेल. मला दोन्ही शंका होत्या.”
माधवी त्याबद्दल पुढे म्हणाली, “तेव्हा सीन कट झाल्यानंतर मी हात सोडला तेव्हा ती रडायला लागली मला वाटलंच की, माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे. माझा हात वगैरे लागलेला दिसतोय. तेव्हा मी तिला विचारलं की काय झालं तुला, लागलं का तुला काही? तर ती म्हणाली, हो आणि खूप लागलं का विचारल्यानंतर ती नाही म्हणाली बिचारी; पण मी पाहिलं तेव्हा तिला ती दांडी खूप लागली होती. इतकी लागली होती की, तिचा चेहरा लाल झाला खूप आणि तिला दुखापत झाली म्हणून मला रडायला आलं.”
माधवी म्हणाली, “मी तिला तेव्हा मिठी मारली आणि माफी मागितली. म्हटलं की, मी मुद्दाम नाही केलं. तेव्हा तिनं सांगितलं की, ताई, ठीक आहे. तू का रडतेयस. तेव्हा सेटवर दिग्दर्शक गंमत करीत आठवण करून देत होते की, शालिनी आहे तू शालिनी. मी म्हटलं थांबा सर मला खरंच वाईट वाटतंय.”