स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. शालिनीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवण्यासाठी मंगल या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. तर दुसरीकडे शालिनीचा भाऊ असलेला राहुलने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. राहुल हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता विकास पाटीलने याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
विकास पाटील हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. त्यात त्याने मालिकेतील राहुलच्या पात्राचे काही व्हिडीओ मर्ज केले आहेत. त्याबरोबर त्याने एक मोठे कॅप्शनही लिहिले आहे.
आणखी वाचा : “फक्त काॅन्टेन्टसाठी…” राखी सावंतबरोबरच्या मैत्रीबद्दल किरण माने स्पष्टच बोलले
विकास पाटीलची पोस्ट
“अलविदा राहुल …
अखेर राहुलचा सुख म्हणजे काय असतं मधला प्रवास संपला …असं वाटतंय काल परवाच शूटिंग सुरु झालं होतं..जवळपास सात महिने ह्या मालिकेचा भाग होतो,पण हे सात महिने सात दिवसांसारखे वाटतायत.
प्रत्येक मालिकेचं युनिट हे एका कुटुंबासारखं असतं आणि हे कुटुंब फारच जिव्हाळ्याचं आणि लाडकं ठरलं ..ज्या प्रेमाने आणि आत्मीयतेने सगळ्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं ते लाजवाब होतं. हि मालिका पहिल्यापासून नंबर वन ला असण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे तिथली पॉसिटीव्हिटी असं मला वाटतं जी फार कमी ठिकाणी जाणवते ..!
मला ह्या कुटंबाचा सदस्य करून घेतल्याबद्दल स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन यांचे मनापासून आभार. प्रत्येकाचे वैयक्तिक आभार मानायचे तर इथे थिसीस लिहावा लागेल पण प्रामुख्याने आमच्या मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत कानसे (सर आता फिल्म करूयात असं ज्यांना सतत म्हणायचो) पूर्ण डिरेकशन टीम खास करून शशी तुम्ही सगळे कमाल आहात !
महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, माधुरी देसाई आणि तिची संपूर्ण प्रोडक्शन टीम, आमच्या मालिकेचा लेखक आणि चांगला मित्र अभिजीत गुरु आणि त्याची टीम , आमचा क्रीटीव्ह हेड, संपूर्ण लाईट, आर्ट, कॉस्च्युम, मेकअप आणि स्पॉट दादांची टीम
आणि लास्ट बट नॉट लीस्ट आमच्या सुपरहिट मालिकेचे सुपरहिट कल्ला कार …
जुग जुग जियो ..और नाम रोशन करो.आणि अर्थात सगळ्यात महत्वाचे आणि मानाचे तुम्ही मायबाप प्रेक्षक ज्यांनी राहुलवर भरभरून प्रेम केलंत …त्याला आपलंस केलंत, असंच प्रेम मी केलेल्या प्रत्येक पात्रावर कराल हा विश्वास आहेच… मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन character सोबत लवकरच …. गणपती बाप्पा मोरया”, असे विकास पाटीलने यात म्हटले आहे.
आणखी वाचा : “मी तयार, फक्त तिला…” आकाश ठोसरने सांगितली लग्नासाठीची एकमेव अट
दरम्यान ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत आता नवा ट्वीस्ट येणार आहे. शालिनीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवण्यासाठी मंगल या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. जवळपास ३० वर्ष खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये घालवल्यानंतर मंगलची सुटका झाल्याचे येत्या भागात पाहायला मिळणार आहे. सुटका होताच जयदीपची भेट घेण्यासाठी ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल होणार आहे.
मंगल ही जयदीपची आई हे पात्र साकारणार आहे. ३० वर्ष मुलापासून दूर राहिल्यानंतर सुटका होताच पहिल्यांदा तिने जयदीपची भेट घेण्याचं ठरवलं आहे. मंगलच्या येण्याने कथानकात धमाकेदार वळण येणार आहे.