अभिनेत्री सुंबूल तौकीर खानचे वडील तौकीर खान यांनी काही दिवसांपूर्वीच दुसरं लग्न केलं आहे. सुंबूलच्या आईचं नाव निलोफर आहे. सुंबूलच्या आईचंही हे दुसरं लग्न होतं, तिला एक मुलगी आहे. त्यामुळे तौकीर कुटुंबात दोन नवीन सदस्य आले आहेत. यंदा संपूर्ण तौकीर कुटुंब मोठ्या थाटामाटात ईद साजरी करत आहे. सुंबूलच्या वडिलांनी फोटो शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या पोलीस कोठडीत वाढ; आणखी तक्रारी आल्याची पोलिसांची माहिती, नेमकं प्रकरण काय?

तौकीर खान यांनी आपल्या तिन्ही मुलींचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच पत्नी निलोफरचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. पण या फोटोत तिचा चेहरा दिसत नाही. या फोटोत सुंबूल व सानियाने त्यांच्या आईला मिठी मारली आहे. सर्वांना ईदच्या शुभेच्छा असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुंबूल सहा वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. सुंबूलचे वडील तौकीर हसन खान यांनी दोन्ही मुलींचं संगोपन केलं आणि करिअरमध्ये पाठिंबा दिला. बरीच वर्षे त्यांनी एकट्यांनी दोन्ही मुली व घर सांभाळलं. त्यामुळे सुंबूल व तिच्या बहिणीने त्यांच्या बाबांना दुसऱ्या लग्नासाठी तयार केलं होतं.