‘सुंदरा मनामध्ये भरली’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये लतिकाची मुख्य भूमिका साकारणारी अक्षया नाईक आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे. अभिनेत्रीचं मूळ गाव गोव्यात आहे. अक्षया व्यग्र कामातून वेळ काढत अनेकदा गोव्याला फिरायला जात असते. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सध्या अक्षयाने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अक्षया नाईकने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना गोव्याची झलक पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचे कुटुंबीय व मित्रमंडळी यामध्ये धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गोव्याची खाद्यसंस्कृती, सुंदर समुद्रकिनारे, निसर्गरम्य वातावरण, नारळाच्या बागा, वाहती नदी या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : राजकारणात येणार का? ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, “संधी मिळाली तर…”

अक्षयाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अभिनेत्री याच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “सुमद्रकिनारे, पार्टी, विविध प्रकारचे पदार्थ, मंदिर, प्रेक्षणीय स्थळं आम्ही सगळं काही पाहिलं.” याशिवाय गोव्यात आल्यावर आमच्या ‘नाईक होम स्टे’मध्ये जरुर राहा असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : पंकज त्रिपाठींचा ‘मैं अटल हूं’ ओटीटीवर होणार प्रदर्शित, ‘या’ अ‍ॅपवर पाहता येणार अटलबिहारी वाजपेयींचा प्रवास

दरम्यान, अक्षयाचा गोव्यात सुंदर असा बंगला आहे. यामध्ये आता आता नागरिकांना भाडं भरून राहता येणार आहे. ‘नाईक होम स्टे’ असं तिने या बंगल्याचं नाव ठेवलं आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेनंतर अक्षयाने रंगभूमीवर पदार्पण केलं. ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.