कलाकारांचं नातं, अफेअर, रिलेशनशिप याबाबत नेहमीच चर्चा रंगताना दिसते. काही कलाकार आपल्या नात्याबाबत उघडपणे बोलताना दिसतात. तर काही कलाकार खासगी आयुष्याबाबत बोलणं टाळतात. असंच काहीसं सुयश टिळक व अक्षया देवधरच्या बाबतीत घडलं. काही वर्षांपूर्वी सुयश व अक्षया एकमेकांच्या प्रेमात होते. आता दोघांचंही वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न झालं आहे. पण या दोघांच्या नात्यामध्ये का दुरावा आला? याबाबत सुयशने नुकतंच भाष्य केलं.

‘प्लॅनेट मराठी’च्या ‘त्या नंतर सगळं बदललं’ या कार्यक्रमात सुयशला अक्षयाबरोबरच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. अक्षयाबरोबर तुझं नातं संपल्यानंतर काही बदललं का? या प्रश्नावर त्याने अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं. तसेच या दोघांचं ब्रेकअप नेमकं का झालं? याबाबतही त्याने भाष्य केलं.

आणखी वाचा – “शेतीच करत राहिलो असतो तर…” ‘सैराट’नंतर तानाजी गालगुंडेने केली पायाची सर्जरी, म्हणाला, “माझे दोन्ही पाय…”

आणखी वाचा – Video : “छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती?” अप्पीचं उत्तर ऐकून नेटकरीही भारावले, म्हणाली, “इतिहासकारांनी वेगवेगळे अंदाज लावले आणि…”

सुयश म्हणाला, “अक्षयाआधी मी एक अनुभव घेतला होता. माझ्याबरोबर हे पहिल्यांदा घडलं नव्हतं. पण अक्षयाबरोबर माझं नातं खूप चांगलं होतं. आमची मैत्री चांगली होती. शिवाय आम्ही एकमेकांना चांगलं समजून घेत होतो. तिच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आलं आहे हे तिला जेव्हा जाणवलं तेव्हा तिने मला मैत्रीच्या नात्याने सगळं सांगितलं. तिच्या या निर्णयाचा मी आदर केला. मला हे नातं सोडून पुढे जावं लागलं”.

आणखी वाचा – “अपघातात त्यांचं निधन झालं आणि…” नाना पाटेकरांनी सांगितला ‘सिंहासन’ दरम्यानचा ‘तो’ वाईट प्रसंग, म्हणाले, “चित्रपटात मी त्यांना मारलं म्हणून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एखाद्या रिलेशनशिपमध्ये जर एकच व्यक्ती नातं ताणून धरत असेल तर त्या नात्याची दिशा बदलते. पण तुम्हाला ते त्यावेळी जाणवत नाही. मलाही तेव्हा ते जाणवलं नव्हतं. पण यासाठी मला कोणालाही जबाबदार ठरवायचं नाही. माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडलं त्यासाठी मी कोणालाच दोषी ठरवलं नाही. तिच्या आयुष्यात माझा प्रवास तिथवरच होता. आम्ही समजुतदारपणे वेगळे झालो. आजही आमच्यामध्ये उत्तम मैत्री आहे. आम्ही एकमेकांना समोर बघू शकत नाही किंवा एकमेकांशी बोलू शकत नाही असं काहीच नाही”. सुयश व अक्षया आज त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले आहेत.