छोट्या पडद्याच्या माध्यमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. २५ डिसेंबरला गौतमीने स्वानंद तेंडुलकरशी लग्नगाठ बांधली. मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी, रिसेप्शन असा समारंभपूर्वक लग्नसोहळा गौतमी-स्वानंदचा झाला. लग्नानंतर दोघं फिरायला मालदीव किंवा गोव्याला न जाता कोकणात गेले. देवबागमध्ये दोघांनी मज्जा केली. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. अशातच काल स्वानंदने पत्नी गौतमीसाठी खास पदार्थ बनवले होते. याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले होते.
अभिनेत्री गौतमी देशपांडे व तिचा पती स्वानंद सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी दोघांचे मजेशीर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे दोघं चांगले चर्चेत असतात. काल गौतमीने स्वानंदने तिच्यासाठी बनवलेल्या खास पदार्थांचा फोटो शेअर केला होता. ज्यावर लिहिल होतं, “शेफ मिस्टर स्वानंद तेंडुलकर.”
हेही वाचा – Maharashtracha Favorite Kon 2023: महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक ठरला ‘हा’ अभिनेता, फोटो आला समोर
स्वानंदने गौतमीसाठी खास चीज गार्लिक ब्रेड आणि त्याच्याबरोबर पास्ता बनवला होता. याचे फोटो गौतमीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. जे चांगलेचं व्हायरल झाले होते.


हेही वाचा – Video: अंकिता लोखंडेच्या पतीचा आयशा खानबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “अंकिता डोकं नसलेली…”
दरम्यान, गौतमीचा नवरा ‘भाडिपा’ या मराठी सीरिज व कंटेट बनवणाऱ्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलचा तो व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम पाहतो आहे. शिवाय त्याचा भाडिपाच्या वेब सीरिज आणि स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात सहभाग असतो. गौतमीप्रमाणे स्वानंद तेंडुलकरचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे.