अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व प्रसिद्ध गायक आशीष कुलकर्णी मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. २५ डिसेंबर २०२३ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. नुकत्याच एका मुलाखतीत स्वानंदी व आशीषने आपापल्या मोबाइलमध्ये एकमेकाचे नाव काय नावाने सेव्ह केले आहे त्याचा खुलासा केला आहे.

स्वानंदी व आशीष सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आसतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतीच दोघांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. या मुलाखतीत त्यांनी एकमेकांच्या मोबाइलमध्ये त्यांची नावे काय म्हणून सेव्ह केली याबाबतचा खुलासा केला आहे. एवढेच नाही, तर यामाचे कारणही सांगितले आहे.

स्वानंदीने आशीषचे नाव कारभारी म्हणून; तर आशीषने स्वानंदीचे नाव बायको म्हणून सेव्ह केले आहे. स्वानंदी आशीषला बेबी म्हणून हाक मारते. मोबाइलमध्ये आशीषचा बेबी नावानेच नंबर सेव्ह होता. मात्र, आता लग्नानंतर स्वानंदीने आशीषचा नंबर कारभारी म्हणून सेव्ह केला आहे. तर आशीष म्हणाला, मी स्वानंदी टिकेकरला डेट करतोय हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती. त्यामुळे लग्नाआधी मी मोबाईलमध्ये स्वानंदी टिकेकर, असे पूर्ण नाव सेव्ह केले होते. मात्र, आता लग्नानंतर बायको नावाने तिचा नंबर सेव्ह केला आहे. स्वानंदी व आशीषचे हे बोलणे आता चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्यामधील या भन्नाट केमिस्ट्रीचे नेटकरी कौतुक करीत आहेत.

हेही वाचा- “…अन् मी मांसाहार सोडला”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा खुलासा; म्हणाली, “साडेपाच महिने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वानंदीच्या कामाबाबत बोलायचे झाले, तर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिच्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’, ‘अगं अगं सूनबाई… ‘ या मालिकांमधील भूमिका चांगल्याच गाजल्या. आशीष प्रसिद्ध गायक आणि गीतकार आहे. त्याचा ‘रॅगलॉजिक’ हा स्वत:चा संगीत बँड आहे. हार्ड रॉक कॅफे, हाय स्पिरिट्स, ब्ल्यूफ्रॉग यांसारख्या अनेक लोकप्रिय म्युझिक बँडबरोबर त्याने काम केले आहे. ‘इंडियन आयडॉल‘च्या सीझन १२ मध्येही तो सहभागी झाला होता.