‘तारक मेहता का उल्टा चष्मा’या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेला गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांची पसंती मिळत आहे, परंतु सध्या ही मालिका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. या मालिकेत ‘मिसेस रोशन सिंह सोढी’ ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने या मालिकेच्या निर्मात्यांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ‘तारक मेहता…’चे निर्माते असित कुमार मोदी तसेच प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि जतिन बजाज यांच्याविरोधात जेनिफरने लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. यावर आता असित कुमार मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : “माझ्या खोलीत ये आपण…” ‘तारक मेहता…’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा निर्मात्यांवर गंभीर आरोप, धक्कादायक खुलासा करत म्हणाली “मी गरोदर असताना…”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी जेनिफरने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. जेनिफर प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ‘ई टाइम्स’शी संवाद साधताना असित कुमार म्हणाले, “या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. हे आरोप निराधार आहेत. खऱ्या आयुष्यात मी कसा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. दिग्दर्शक आणि त्यांच्या टीमने जेनिफरला शो सोडण्यास सांगून, आम्ही तिला (जेनिफर) शोमधून आणि आमच्या टीममधून काढून टाकले होते. याबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. लवकरच आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि आमची प्रॉडक्शन टीम सर्व पुरावे आणि कागदपत्रांचा खुलासा करेल.”

हेही वाचा : ‘हॅपी मॅरीड लाइफ’साठी दीपिकाने दिला खास सल्ला; रणवीरविषयी सांगताना म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकेच्या संपूर्ण टीमसोबत तिची वागणूक योग्य नव्हती. शूटवरून निघताना जेनिफरने सेटवरील एकाचीही पर्वा न करता वेगाने गाडी चालवली. तसेच सेटवरील मालमत्तेचेही नुकसान केले. या बेशिस्तपणामुळे आम्हाला तिच्यासोबतचा करार संपवावा लागला. ही घटना घडली तेव्हा असितजी अमेरिकेला होते. आता ती तथ्यहीन आरोप करत आहे. याविरोधात आम्ही आधीच तक्रार दाखल केली आहे, असे प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि जतिन बजाज म्हणाले.