गेली १६ वर्ष ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत खळखळून हसवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर अजूनही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. मालिकेतील कलाकारांना त्यांच्या भूमिकांमुळे नवी ओळख मिळाली आहे. त्यापैकी एक म्हणजे आत्माराम तुकाराम भिडे अर्थात मंदार चांदवडकर. जेठालाल, तारक मेहता यांच्याप्रमाणेच भिडे मास्तर यांचाही एक वेगळा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

अभिनेता मंदार चांदवडकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मंदार चांदवडकर पेरुच्या शेतात गेलेले पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ते मंदार म्हणतायत, “नमस्कार मंडळी, पेरु देशात जाईन तेव्हा जाईन. पण, आपल्या देशातल्या पेरुच्या बागेत मी आलो आहे. माझ्या मागे पाहू शकता, पेरुची कलमं लावलेली आहेत. खूप छान वाटतंय. बघा शेतकरी राजाकडून किती काळजी घेतली जातेय.”

हेही वाचा – ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”

हेही वाचा – अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”

पेरुच्या शेतातील दुसरा व्हिडीओ मंदार यांच्या पत्नी स्नेहल चांदवडकर यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पेरुच्या शेतात मंदार आणि स्नेहला डान्स करताना दिसत आहे. दोघं मकरंद अनासपुरे यांचं लोकप्रिय गाणं ‘रानी माझ्या मळ्यामंदी’वर थिरकताना पाहायला मिळत आहे. दोघांच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

या डान्सवर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “भिडे भाई आता माधवी वहिणीला सांगतोच की, आजकाल तुम्ही शेतात डान्स करत आहात.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आज इकडे कुठे आलात?” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, वाह क्या बात है भिडे जी.

हेही वाचा – हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भिडे मास्तर म्हणजे मंदार चांदवडकर यांची पत्नी स्नेहल चांदवडकरदेखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. त्यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकेत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘नवे लक्ष्य’, ‘१०.२९ की आखिरी दस्तक’, अशा काही मालिकांमध्ये स्नेहल चांदवडकर यांनी काम केलं आहे.