Savalyachi Janu Savali Upcoming Promo: वटपौर्णिमा हा सण नुकताच साजरा करण्यात आला. आता टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांमध्येदेखील वटपौर्णिमेचे सीन पाहायला मिळत आहे. यादरम्यान, काही मालिकांमध्ये विविध ट्विस्टदेखील आल्याचे पाहायला मिळाले.

आता ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत वट पौर्णिमेच्या निमित्ताने सारंग व सावली यांचे नाते अधिक दृढ होताना दिसणार आहे. झी मराठी वाहिनीने या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सारंग सावलीला साथ देताना दिसणार आहे.

सावलीच्या पायाला जखम होते, सारंग तिला सावरतो. तसेच तो तिला हेही सांगतो की, त्रास होत असेल तर पूजा करायची काही गरज नाही. त्यावर सावली म्हणते की, हा क्षण एका सौभाग्यवतीच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. त्यानंतर सावलीच्या पायाला लागल्यामुळे तिला त्रास होतो, हे सारंगला जाणवते. तो सावलीला उचलून घेतो व म्हणतो की, सौभाग्याचं हे कर्तव्य पार पाडत असताना तुला एकटीला सोडू शकत नाही; सावली, मी कायम तुझ्या बरोबर राहीन.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, प्रत्येक पावलावर सारंग देणार सावलीची साथ, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत सारंगचे कौतुक केले आहे. “सारंग व सावली माझी आवडती जोडी आहे”, “खूप छान सारंग”, “सारंग, किती गोड”, “सारंगचा अभिनय खूप खरा वाटतो”, अशा कमेंट केल्या आहेत. काहींनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत, तर काहींनी तारा कृतघ्न असल्याचे म्हटले आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, मालिकेत काही दिवसांपूर्वीच सावलीने सोहम व तारा यांचे लग्न लावून दिले. सोहम हा सावलीचा दीर आहे, तर तारासाठी सावली ही गाणे गाते. त्यानंतर सारंगने सर्वांसमोर सावलीप्रती त्याचे प्रेम व्यक्त केले. संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर काढायचे आहे, असे म्हणत सारंगने सावलीला लग्नाची मागणी घातली. सारंग व सावली यांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली.

सावली ही गरीब कुटुंबातील आहे. तिचा आवाज चांगला आणि तिला गाणे गाता येते, हे ओळखून भैरवी वझेने सावलीने तिच्या मुलीसाठी गाणे गायचे; त्या बदल्यात भैरवी सावलीच्या भावाच्या दवाखान्यासाठी पैसे देईल, असे आश्वासन तिच्या कुटुंबाला देते, त्यामुळे खरे तर सावली गाणे गाते. पण, तिच्या आवाजाचा वापर करून तारा लोकप्रिय गायिका ठरली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता सावली ताराला चोख उत्तर देणार का, ताराचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.