मुनव्वर फारुखीची एक झलक पाहण्यासाठी मुंब्र्यात लोकांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज, मोबाईलही चोरीलाBigg Boss 17 Winner मुनव्वर फारुखी याचा एक कार्यक्रम ठाण्याजवळच्या मुंब्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात Munnwar Faruqui ची एक झलक पाहण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी झाली. शनिवारी रात्री हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुनव्वर फारुखी रिसॉर्टवरुन कार्यक्रमाच्या स्थळी आला तेव्हा मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित केला होता कार्यक्रम

जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथील अब्दुल कलाम मैदानात हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुंबई, ठाण्याचे लोक आले होते. तसंच महाराष्ट्रातल्या काही भागांतून आणि दिल्ली तसंच बिहारमधूनही लोक आले होते. मुन्नवर फारुखीची एक झलक पाहण्यासाठी या मैदानात प्रचंड गर्दी झाली. या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुन्नवरला पोलिसांनी अत्यंत कडेकोट बंदोबस्तात आणि अक्षरशः हातांचं कडं करुनच स्टेजवर आणलं.

हे पण वाचा- ‘बिग बॉस १७’ विजेता मुनव्वर फारुकी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर करतोय काम, फोटो झाले व्हायरल

मुनव्वर फारुखीच्या कार्यक्रमात लाठीचार्ज

मुनव्वर फारुखीच्या या जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या कार्यक्रमात गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ‘बिग बॉस 17’ संपलं असलं तरी मुनव्वरची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सध्या तो चाहत्यांच्या संपर्कात येत आहे. नुकतचं मुंब्र्यात मुनव्वरचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्याचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अनेकांचे फोनही चोरीला गेले. कारण गर्दीच इतकी झाली होती की पोलिसांपुढे पर्यायच उरला नाही. द फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी मानले मुनव्वरचे आभार

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुनव्वरचे आभार मानले आहेत. थँक्यू म्हणत त्यांनी मुनव्वरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. मुंब्र्यातील लोकांना मुनव्वरला भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे आव्हाडांनी त्याला बोलावलं. दरम्यान विनोदविराला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. विनंतीला मान देत मुनव्वर मुंब्र्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी मुनव्वरचे आभार मानले.

View this post on Instagram

A post shared by Jitendra Awhad (@jitendra.awhad)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनव्वर फारुखीचा अल्पपरिचय

मुनव्वर फारुखी हा लोकप्रिय विनोदवीर, रॅपर आणि गायक आहे. ‘बिग बॉस 17’ आधी कंगना रणौतच्या लॉकअप या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. मुनव्वर व्हायसायिक कामांसह खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. गरीबी पाहिलेला मुनव्वर आज कोट्यवधींचा मालक आहे. विनोदवीराच्या आगामी कार्यक्रमांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. ‘बिग बॉस 17’चा विजेता झालेल्या मुनव्वरवर अजूनही शुभेच्छांचा वर्षाव सुरुच आहे.