टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत राहणारा ‘कपिल शर्मा शो’ प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. यातील प्रत्येक पात्राने आणि ते साकारणाऱ्या कलाकाराने प्रेक्षकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यातील सर्व कलाकारांपैकी सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा कृष्णा अभिषेक आणि कपिल शर्मा यांच्यात काही वाद असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतात. कपिल आणि कृष्णा यांनी अनेकदा यावर प्रतिक्रिया दिल्या मात्र त्यांनी एकत्र काम केलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांना अद्याप या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे की वाद याबाबत संभ्रम आहे. अशात आता कृष्णाने कपिल शर्मा शोबद्दल नवीन अपडेट शेअर करतानाच कपिल शर्माबरोबर वादाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

कृष्णा अभिषेक ‘द कपिल शर्मा शो’चा महत्त्वाचा भाग होता. मात्र मागच्या वर्षी सुरु झालेल्या तिसऱ्या सीझनमध्ये मात्र तो या शोमध्ये दिसलाच नाही. शोमध्ये कृष्णा साकारत असलेलं ‘सपना’ हे पात्र परत कधी येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. मागच्या वर्षी १० डिसेंबरला सुरु झालेल्या तिसऱ्या सीझनमध्ये सुमोना चक्रवर्ती कपिलच्या पत्नीचं म्हणजेच बिंदूचं पात्र साकारताना दिसली होती. याशिवाय या सीझनमध्ये चंदन प्रभाकर, कीकू शारदा हेसुद्धा दिसले होते.

आणखी वाचा- Video: टेलिप्रॉम्पटर बघून कॉमेडी करतो कपिल शर्मा; Video Viral झाल्यानंतर चाहते आणि ट्रोलर्समध्ये जुंपली

आता इंडियन एक्सप्रेसशी बोलताना कृष्णा म्हणाला, “माझं कपिलवर प्रेम आहे. त्या शोवर माझं प्रेम आहे. कपिल एक उत्तम व्यक्ती आहे, एक चांगला मित्र आहे आणि मला तो माझ्या भावासारखा आहे. अनेक वर्षे त्याने माझी खूप काळजी घेतली आहे. मला अनेकांनी सांगितलं की तो खूप बदलला आहे त्याच्या शोमध्ये काम करू नकोस. पण खरं सांगू तर त्याच्यासारखा मेहनती कलाकार दुसरा कोणी नाही. त्याची कॉमेडी आणि त्याच्यासारखं सर्वांना एकत्र घेऊन चालणं आणि टीमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, हे सगळं सोप्पं नाही. आमच्या सर्वांसाठी काही वर्षं हे सगळं केल्यानंतर नवीन कंटेंट तयार करणं खरंच कठीण होतं. पण तो प्रेक्षकांना नेहमीच काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करतो, हा एक चांगला शो आहे.”

आणखी वाचा- दिवाळी पार्टीमध्ये अचानक रोमँटिक झाला कपिल शर्मा, सर्वांसमोर पत्नीला केलं Kiss अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनी टीव्ही आणि कपिलबद्दल बोलताना कृष्णा म्हणाला, ‘मला कपिलबरोबर काम करायचे आहे आणि मला खात्री आहे की आम्ही काहीतरी काम करू. मी कपिलचा खूप आदर करतो आणि मला वाटते की तो माझ्याबद्दल असंच म्हणेल. आम्ही लवकरच एकत्र येऊ. मला त्याची आणि टीमची खूप आठवण येते. मला किकू शारदा आवडतो. ते असे अद्भुत लोक आहेत. सोनीबरोबर काही गोष्टी जुळत नसल्या तरीही ते माझे कुटुंब आहेत. मी बराच काळ या चॅनेलसाठी काम केलं आहे, त्यामुळे ते माझ्यासाठी घरासारखं आहे. जसं म्हणतात ना की, ‘सुबह का भूला अगर शाम को घर आ जाए, तो उसे भूला नहीं कहते’. अगदी तसंच मीसुद्धा परत येईन.