गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपापल्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात. या वर्षीही अनेक कलाकारांनी आपल्या घरी गणपती बाप्पाचं थाटात स्वागत केलं. अभिनेता अर्जुन बिजलानीच्या घरीही दरवर्षी बाप्पाचं आगमन होतं. अर्जुन दरवर्षी स्वत:च्या हातानं गणेशमूर्ती घडवतो पण, त्याचा गणेशोत्सवादरम्यानच्या एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,
अनेक कलाकार दरवर्षी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अर्जुन बिजलानीच्या घरी येतात. यंदाही गणेशोत्सवासाठी काही कलाकार अर्जुनच्या घरी आले होते. बाप्पाची पूजा आणि भक्ती करताना कलाकारांचा धांगडधिंगा पाहून नेटकरी संतापले आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये टीव्हीवर घालीन लोटांगण हे आरतीचं गाणं सुरू असल्याचं दिसत आहे. आणि हे कलाकार ‘घालीन लोटांगण’वर डान्स करत आहेत. या व्हिडीओमध्ये अर्जुन बिजलानी, त्याची पत्नी, निया शर्मा आणि आणखीही काही कलाकार आहेत. अभिनेत्याच्या घरातील हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले आहेत.
अनेकांनी या व्हिडीओवर “पूजा कमी आणि ड्रामा जास्त वाटतोय”, “या गाण्यावर असा डान्स करत नाहीत”, “देवाच्या नावावर पार्टी आणि डान्स…हे बरोबर आहे का? देवाचा आदर करा”, “देवाची पूजा अशी करीत नाहीत”, “आमच्या मराठी कलाकारांकडून शिका देवांचा आदर कसा करायचा” अशा कमेंट्स केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी अर्जुन बिजलानीनं एक भावनिक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये अर्जुन त्याच्या कुटुंबाबद्दल बोलताना दिसत होता. तसेच त्यानं म्हटलं होतं की, त्याला वेगळा मार्ग निवडावा लागेल आणि हा त्याच्यासाठी खूप कठीण निर्णय आहे. अर्जुनच्या या व्हिडीओनंतर लोक असा अंदाज करीत होते की, तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देणार आहे. अर्जुन बिजलानीनं स्वतः त्या व्हिडीओबद्दल सांगितलं होतं.
या व्हिडीओमध्ये अर्जुन बिजलानीनं त्याची पत्नी नेहाबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत आणि म्हटले आहे की, तो त्याची पत्नी नेहाला घटस्फोट देत नाही आहे.