Thoda Tuza Ani Thoda Maza fame actress: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे हे प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेत्री मानसी कुलकर्णीने खलनायिकेची भूमिका साकारली आहे.

सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे मालिकेत पुढे काय होणार, ही प्रेक्षकांना उत्सुकता असते. आता मात्र मालिकेतील कथानकामुळे नाही तर मालिकेतील एका अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. मालिकेत छाया भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

“अखेर तीन महिन्यांच्या आरामानंतर…”

अभिनेत्री मानसी घाटेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तिला आजाराला सामोरे जावे लागल्याचे सांगितले. तिने या व्हिडीओमध्ये काही फोटो शेअर केले. तीने त्यावर लिहिले की सतत अंगावर सूज येत होती आणि हिमोग्लोबिन कमी होत होते. त्यानंतर रक्ताच्या चाचण्या झाल्या. बायोप्सी, वॉटर टॅपिंग, एन्डोस्कोपी असं बरंच काही केलं. रोज स्वत: ला मॉनिटर करणं आणि खूप गोळ्या खाणं, हे सुरू होतं.

पुढे जेव्हा ती बरी होऊन सेटवर परतली तेव्हा सेटवरील सर्वांनी तिचं ज्या पद्धतीने स्वागत केले, त्याचा व्हिडीओ तिने शेअर केला. त्यावर लिहिले, “अखेर तीन महिन्यांच्या आरामानंतर मी पुन्हा एकदा कामाला सुरूवात करणार होते.मनात थोडी भीती होतीच. मला हे झेपेल का? मी इतका वेळ शूटिंग करू शकेन का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण स्वामींची कृपा आणि माझ्या प्रोड्यूसर, दिग्दर्शक, सहकलाकार, माझं कुटुंब, मित्र परिवार या सर्वांच्या भक्कम आधारामुळे आणि त्यांच्या विश्वासामुळे आज मी उभी राहू शकले.

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री भावुक असल्याचे दिसत आहे. पुढे तिने लिहिले, “आपल्यावर प्रेम करणारे इतके लोक आपल्या आजुबाजूला आहेत, हे पाहून मन पुन्हा पुन्हा भरुन येत होतं. माझी आई, दादा, वहिनी, नवरा आणि बाकिचे नातलग या सर्वांनीच खूप आधार दिला. हे माझे सहकलाकार नसून माझे दुसरे कुटुंब आहे. रोज फोन करून माझ्या प्रकृतीची विचारपूस करणं आणि या आजारातून लवकरात लवकर बाहेर पडावं यासाठी सगळेच आपापल्या परीने प्रयत्न करत होते. आपल्या पडत्या काळात आपले जवळचे आणि आपण जोडलेली माणसं आपल्या मदतीला येत असतात.

तिने असेही लिहिले की ‘एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मले मी’.खरंच मी काय बोलू कळत नाहीये.आभार मानून परकं कोणाला परकं करायचं नाही. पण आजवर आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर मात करून आज मी तुमच्या बरोबर परत त्याच जोमाने उभी आहे कारण- फक्त तुम्ही सगळे माझ्या पाठीशी स्वामींच्या रूपात उभे आहात.”

दरम्यान, आता मानसी आजारपणातून बरी होऊन पुन्हा काम करण्यास सज्ज झाल्याचे दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.