सब वाहिनीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा चाहतावर्ग जगभरामध्ये पसरला आहे. कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमधील कलाकारांना लोक त्यांच्या भूमिकेच्या नावाने ओळखतात. एक काळ असा होता, जेव्हा ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावर होती. पण पुढे हळूहळू कथानकामध्ये रटाळपणा यायला लागला. याच सुमारास मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे कलाकार मालिका सोडू लागले.

अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेमध्ये ‘दया गडा’ ही प्रमुख पात्र साकारत होती. उत्कृष्ट अभिनय आणि अचूक टायमिंगच्या जोरावर तिने ही भूमिका अजरामर केली. २०१७ मध्ये दिशाने मालिकेला निरोप दिला. तेव्हापासून प्रेक्षक ती मालिकेमध्ये कधी परतणार आहे याची वाट पाहत आहेत. मध्यंतरी मालिकेचे निर्माते दिशाच्या जागी नव्या अभिनेत्रीचा शोध घेत आहेत असे म्हटले जात होते. याच सुमारास अभिनेत्री काजल पिसाळने या पात्रासाठी ऑडिशन दिली होती. त्यानंतर दयाबेन म्हणून तिची निवड झाली असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

आणखी वाचा – ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळेला डंपरची धडक, अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

तिने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत दयाबेनच्या अवतारामधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने या भूमिकेसाठी ऑडिशन दिली असल्याचे कबूल केले आणि अजूनही या कामाची निश्चिती नसल्याची माहितीही चाहत्यांना दिली. मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांना उद्देशून तिने ‘माध्यमांच्या अपुऱ्या माहितीमुळे मी बोललेल्या गोष्टी लोकांपर्यंत चुकीच्या अर्थाने पोहोचल्या. आता हीच गोष्ट असित मोदी सरांबरोबर होत आहे’, असे म्हटले.

आणखी वाचा – Video : चुकी कोणाची? अर्चना गौतमने गळा दाबल्यानंतर सलमान खान मराठमोळ्या शिव ठाकरेवरच संतापला

“ते (असितकुमार मोदी) म्हणाले, कोण काजल पिसाळ? होय. ते मला ओळखत नाही, आम्ही एकमेकांना कधी भेटलो नाही. दयाबेनची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी सुवर्णसंधी होती. पण ती संधी मी गमावली. माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर आहे. भविष्यामध्ये आपण एकत्र काम करु अशी माझी इच्छा आहे”, असे काजलने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.