बॉलिवूडप्रमाणे छोट्या पडद्यावरील कलाकारदेखील प्रसिद्ध आहेत. तारक मेहता मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे निधी भानुशाली. जरी तिने मालिका सोडली असली तरी तिची ओळख मालिकेतील सोनू या पात्रामुळे निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सोनू चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच निधीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

निधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती चमकदार ब्रॅलेट परिधान केलेली दिसत आहे. याचबरोबरीने निधीने निळ्या रंगाचा शर्ट जोडला आहे, ज्याची बटणे तिने कॅमेऱ्यासमोर उघडली आहेत. निधी आरशासमोर उभी आहे आणि तिचे किलर लूक दाखवत आहे. फोटोमध्ये ती नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे. यादरम्यान निधीने तिचे केस मोकळे सोडले होते.

बॉलिवूडच्या तीन खानपैकी कोण आवडतो? कतरिना कैफ म्हणाली, “चित्रपटाच्या सेटवर.. “

सोनूची महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या निधीने अल्पावधीतच तिच्या चेहऱ्यावरील निरागसतेने सर्वांची मने जिंकली. अर्थात, तिने मालिका सोडल्यापासून बराच काळ लोटला आहे, परंतु असे असूनही निधी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. याआधी तिचे अनेक बोल्ड लूक व्हायरल झाले आहेत. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोलदेखील केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माध्यमांच्या माहितीनुसार निधीने आपल्या पुढील शिक्षणासाठी मालिका सोडली आहे असं म्हंटले जात होते. २०१९ साली तिने मालिका सोडली. सध्या ही भूमिका पलक सिधवानी साकारत आहे.