Tu Hi Re Majha Mitwa Serial Update : स्टार प्रवाहची ‘तू ही रे माझा मितवा’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंत पडत आहे. मालिकेतील अर्णव-ईश्वरी यांची मैत्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडताना दिसत आहे. मात्र सध्या त्यांच्या मैत्रीत दुरावा आला आहे. अर्णव-ईश्वरी यांच्यातील मैत्रीनंतर दोघांची लव्हस्टोरीसुद्धा सुरू होणार होती; मात्र हे न होता या कथानकात एक वेगळाच ट्विस्ट आला. तो म्हणजे अर्णवचा लावण्याशी साखरपुडा झाला आणि इकडे राकेश-ईश्वरी यांचंसुद्धा लग्न ठरलं.
मालिकेत काही दिवसांपूर्वी राकेशच राजेशचं असल्याचं सत्य अर्णव समोर आलं. पण बहिणीच्या काळजीपोटी त्याचं सत्य तो कोणाला सांगू शकत नाहीय. राकेशबद्दलचं सत्य समजल्याने त्याचं ईश्वरीबरोबर लग्न होऊ नये म्हणून अर्णव प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे मात्र ईश्वरीच्या घरच्यांना तिचं राकेशबरोबर लवकरात लवकर लग्न व्हावं असं वाटत आहे. ईश्वरीच्या बाबांच्या मनात आधीच व्हिलन ठरलेला अर्णव अजून व्हिलन वाटावा; यासाठी राकेश त्याचे प्रयत्न करत आहे.
अशातच राकेशने अर्णवच्या गाडीने ईश्वरीच्या बाबांचा अपघात केला आहे. खरंतर हा अपघात राकेशने घडवून आणला आहे. मात्र गाडी अर्णवची असल्याने सगळ्यांचा अर्णवचा संशय आला आहे. अशातच नुकत्याच झालेल्या भागात ईश्वरीच्या मनात अर्णवविषयीचा गैरसमज आणखीनच वाढला आहे. वडिलांचा अपघात झाल्यानंतर अर्णवने भेटायला यावं असं तिला वाटत आहे. त्यात आता आणखी भर म्हणून राकेश याप्रकरणी अर्णवला अडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
ईश्वरीच्या बाबांच्या अपघाताच्या ठिकाणी अर्णवची गाडी दिसल्याने या अपघाताच्या संशय त्याच्यावर आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिस कार्यवाहीत त्याचं नाव समोर येताच त्याला अटक करण्यात येणार असल्याचं नुकत्याच आलेल्या प्रोमोमधून दिसत आहे. या प्रोमोमध्ये अर्णवचे मामा अर्णवला अपघाताप्रकरणी माध्यमांमध्ये त्याचं नाव आल्याचं सांगतात. पण यावर अर्णव यामुळे त्याला काहीच फरक पडत नसून या सगळ्याबद्दल ईश्वरीला काय वाटतं? हे महत्त्वाचं असल्याचं तो सांगतो.
या प्रोमोमध्ये पुढे अर्णव ईश्वरीला म्हणतो, “एकदा माझ्या डोळ्यांत बघून सांग की, मी तुझ्या बाबांचा अपघात केलाय?” पण त्यावर ईश्वरी काहीच प्रतिक्रिया देत नाही. यावर अर्णव पुन्हा ईश्वरीला म्हणतो, “माझ्यावर झालेले आरोप हे खोटे आहेत, असं तुलाही वाटतंय. त्यामुळे मी माझ्यावरचे आरोप खोटे असल्याचं नक्कीच सिद्ध करेन.” दरम्यान, आता याप्रकरणी अर्णव स्वत:ला कसं निर्दोष सिद्ध करणार? याप्रकरणी राकेशचं नाव समोर येणार का? त्याचं सत्य ईश्वरी आणि तिच्या कुटुंबीयांना कळणार का? ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.