टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान तुनिषाचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानची पोलीस कसून चौकशी करत आहेत. धर्म वेगळा होता आणि वयातील अंतर यामुळे आपण तुनिषापासून दूर झाल्याचं शिझानने म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा शिझानने आपलं मत बदललं आहे.

आणखी वाचा – तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणात मुकेश खन्नांनी तिच्या आई-वडिलांनाच ठरवलं जबाबदार, म्हणाले, “मोठी चूक तर…”

‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार तुनिषाबरोबर ब्रेकअप का केलं? याबाबत शिझानने नवं कारण दिलं आहे. शिझानने पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, शिझानला त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. म्हणून त्याने तुनिषाबरोबर ब्रेकअप केलं.

आणखी वाचा – Video : रुग्णालयामध्ये तुनिषा शर्माचा मृतदेह पाहून आईची झाली अशी अवस्था, ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही हळहळले

शिझानने तुनिषाबरोबर ब्रेकअर करण्याचं कारण पुन्हा बदलल्याने विविध चर्चा होत आहेत. त्याचबरोबर शिझानने मुलीची फसवणूक केली. तो तिच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या मुलीबरोबरही होता. त्याने आपल्या मुलीचा वापर केला, असे अनेक आरोप तुनिषाच्या आईने त्याच्यावर केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पोलीस शिझानच्या कथित गर्लफ्रेंडचा शोध घेत आहेत. शिझानने दुसऱ्या मुलीसाठी तुनिषाशी ब्रेकअप केलं होतं, असं तिच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. पण तुनिषा आत्महत्या प्रकरणात नेमकं दोषी कोण? याचं कारण पोलीस तपासातूनच समोर येईल.