तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. बॉयफ्रेंड शिझान खानवर तुनिषाच्या आईने तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. तुनिषा आत्महत्या प्रकरणी शिझानच्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे. तुनिषाच्या आईने आता पत्रकार परिषद घेत पुन्हा तुनिषावर गंभीर आरोप केले आहेत.

तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. “शिझान व त्याच्या कुटुंबियांकडून तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात होता. तिला बुरखा घालण्यासाठीही शिझानच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले होते. शिझानची बहीण फलक नाझने तिला जबदरस्तीने हातावर टॅटू काढायला लावला. मला कुत्रे आवडत नाहीत. तरी मला सरप्राइज देण्यासाठी सांगितलं”, असे गंभीर आरोप तुनिषाच्या आईने केले आहेत.

हेही वाचा>> “शिझान खानला फाशी द्या”, तुनिषा शर्माच्या आईला भेटल्यानंतर रामदास आठवलेंची मागणी

“तुनिषा खूप भावनिक होती. त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होती. तुनिषाबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना त्याने दुसऱ्या मुलीशी संबंध का ठेवले? तुनिषाने २५ हजारांचे गिफ्ट्स शिझानला दिले होते. त्यांनी तुनिषाचा उपयोग करुन घेतला. तुनिषाने आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी मी सेटवर गेले होते. तेव्हा मी शिझानशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. सॉरी, आता काही होऊ शकत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, असं मला शिझान तेव्हा म्हणाला”, असंही पुढे तुनिषाच्या आईने म्हटलं आहे.

हेही वाचा>> ब्राझील फुटबॉलपटू पेले यांचा जीवनप्रवास पाहायचा आहे का? नेटफ्लिक्सवरील ‘हा’ बायोपिक नक्की पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुनिषाने २४ डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. २७ डिसेंबरला तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाने अनेक मालिका व चित्रपटांमध्येही काम केलं आहे.