छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. तिच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वांनाचा धक्का बसला आहे.

तुनिषा शर्माच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून तिच्यावर २७ डिसेंबर रोजी मीरा रोड येथे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तिचे जवळचे नातेवाईक पवन शर्मा यांनी ANI ला ही माहिती दिली आहे. रात्री उशिरा तिचा मृतदेह जे. जे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला. मुंबईतील जे. जे रुग्णालयात रात्री दीड वाजता तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु झाले. पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

“प्रेम सर्वात….” तुनिषा शर्माच्या ‘त्या’ टॅटूची सोशल मीडियावर चर्चा

तुनिषा शर्मा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. या मालिकेचे शूटिंग वसई पुर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता ती आपल्या मेकअप रूपमध्ये गेली आणि गळफास घेतला. ही बाब संध्याकाळी ५ वाजता सहकार्‍यांना समजली. तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुनिषा शर्माचा जन्म चंदीगढचा, तिने वयाच्या १४ व्या वर्षी अभिनय करण्यास सुरुवात केली. तुनिषाने यापूर्वी ‘फितू’र, ‘बार बार देखो’, ‘दबंग ३’, ‘कहानी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिरीये, मन बसिया, तू बैठे मेरे सामने, यासह काही संगीत व्हिडिओंमध्ये देखील दिसली होती.