उत्तर प्रदेशमध्ये झाडासंदर्भात झालेल्या वादातून टेलिव्हिजन अभिनेता भूपिंदर सिंगने गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बिजनौरमध्ये घडली आहे. कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी टीव्ही अभिनेता भूपिंदरविरुद्ध तक्रार नोंदवून त्याला अटक केली. त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

‘न्यूज १८’ ने दिलेल्या वृत्तानुसार, कुआनखेडा खडरी गावात भूपिंदर सिंग राहतो. इथे त्याचे फार्महाऊस देखील आहे. शेजारी राहणारे गुरदीप आणि भुपिंदर यांच्यात निलगिरीच्या झाडावरून वाद झाला. ते झाड कोणाचे यासाठी झालेल्या भांडणानंतर वाद विकोपाला गेला भूपिंदरने परवानाधारक पिस्तुलमधून गोळीबार केला. या घटनेत गुरदीप सिंग, त्यांची पत्नी मीराबाई आणि त्यांचा मुलगा अमरिक उर्फ बुटा सिंग हे गंभीर जखमी झाले, तर गुरदीप सिंग यांचा २२ वर्षीय मुलगा गोविंद सिंग याचा जागेवरच मृत्यू झाला.

“मी त्याच्याबरोबर बसून…”, घटस्फोटाच्या १३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली पूर्वाश्रमीच्या पतीला भेटायची इच्छा

घटनेची माहिती मिळताच डीआयजी मुनीराज घटनास्थळी पोहोचले आणि जखमींची विचारपूस केली. गुरदीपचे भाऊ जीत यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा भूपिंदर आणि त्याचा नोकर ग्यान सिंग, जीवन सिंग आणि गुर्जर सिंग यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ग्यानसिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले भूपिंदर सिंग आणि ग्यान सिंग यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले, तर जीवन सिंग आणि गुर्जर सिंग फरार आहेत.

“आमची रोज भांडणं होतात”, ऐश्वर्या रायने केलेला खुलासा; अभिषेक बच्चन म्हणालेला, “आयुष्य खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूपिंदर यांनी आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही शो ‘जय महाभारत’मधून केली होती. आतापर्यंत त्यांनी ‘८५७ क्रांती, ‘ये प्यार ना होगा काम’, ‘मधुबाला – एक इश्क एक जुनून’, ‘एक हसीना थी’, ‘तेरे शहर में’, ‘काला टिका’ आणि ‘रिश्तों का चक्रव्यूह’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. भूपेंद्र यांनी ‘सोच’ आणि ‘युवराज’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं होतं.