‘झी मराठी’ वाहिनीवरील अवधूत गुप्ते यांचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा टॉक शो नेहमीच चर्चेचा विषय असतो. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांनी या शोवर नाराजी व्यक्त केली होती. शोमध्ये राजकारणी लोकांच्या मुलाखती पाहून नेटकरी म्हणाले होते, ‘मराठी कलाकार संपलेत आणि राजकारणीच लोक आता कलाकार झालेत.’ तसेच या शोचं नाव ‘गुप्ते तिथे राजकारणी’, असं ठेवण्याचा खोचक सल्लाही दिला होता. असं असनूही पुन्हा एकदा या शोमध्ये आणखी एका दिग्गज नेत्याची मुलाखत पाहायला मिळणार आहे. आगामी भागात ज्येष्ठ भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी होणार आहेत.

हेही वाचा – सकीना-तारा सिंहच्या लव्ह स्टोरीमध्ये नाना पाटेकरांची दमदार एंट्री, दिसणार ‘या’ भूमिकेत

नुकताच नितीन गडकरी यांच्या मुलाखतीचा पहिला प्रोमो व्हिडीओ ‘झी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ‘गुप्तेंच्या खुपणाऱ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला येताहेत नितीन गडकरी,’ असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

या व्हिडीओमध्ये अवधूत गुप्ते काही नेत्यांचे फोटो दाखवून त्यांच्याबद्दलच्या खुपणाऱ्या गोष्टी नितीन गडकरींना विचारत आहेत. यावेळी शरद पवारांचा फोटो दाखवला असताना गडकरींनी त्याच्याबद्दल खुपणारी गोष्ट सांगितली, “पवारसाहेब कधीच स्पष्ट बोलत नाहीत.” तसेच व्हिडीओत उद्धव ठाकरेंबद्दलही गडकरी खुपणारी गोष्ट सांगताना दिसत आहेत.

हेही वाचा – “मी अजय देवगणविरोधात खटला दाखल केला तर…”; काजोलनं सांगितलं काय होईल

हेही वाचा – “प्रथमेशला ‘दादा’ म्हणून मारायचे हाक, तर तो मला…”; मुग्धा वैशंपायनने सांगितला ‘तो’ मनोरंजक किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी अवधूत गुप्ते यांच्या या टॉक शोमध्ये काही राजकीय मंडळी येऊन गेली आहेत. या शोची सुरुवातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीपासून झाली होती. त्यानंतर नारायण राणे, संजय राऊत, ऊर्मिला मातोंडकर व श्रेयस तळपदे यांनी या शोमध्ये हजेरी लावली.