अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. उर्फी तिच्या हटके स्टाइलसाठीही ओळखली जाते. अतरंगी कपड्यांमधील तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता उर्फी नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या नव्या गाण्याची झलक व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. ‘हाय हाय ये मजबूरी’ असे उर्फीच्या गाण्याचे बोल आहेत. ‘सारेगम म्युझिक’ने या गाण्याची निर्मिती केली असून त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन ते प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यातही उर्फीने अतरंगी स्टाइलचे कपडे परिधान केले आहेत. लाल रंगाच्या साडीमध्ये पावसात डान्स करत तिने बोल्डनेसचा तडका लावला आहे.

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंना ‘धगधगती मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर आदेश बांदेकरांनी शेअर केला जुना व्हिडीओ

हेही पाहा >> Photos : भाग्यश्री मोटेच्या साखरपुडा सोहळ्यात हृतिक रोशनला पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, जाणून घ्या कारण

उर्फीचं हे नवं गाणं प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. अवघ्या काही तासांतच उर्फीच्या या नव्या गाण्याला ४४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत “उर्फीचे एक्सप्रेशन हे स्टारकिड्सपेक्षा शंभरपटीने चांगले आहेत”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “उर्फी तू हे गाणं वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहेस”, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा >> साजिद खानवर शर्लिन चोप्राने पुन्हा केले गंभीर आरोप, गुप्तांगाचा उल्लेख करत म्हणाली “त्याने मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फी याआधी ‘बेफिकरा’, ‘तेरे इश्क में’ या गाण्यांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. विचित्र कपड्यांमुळे उर्फीला नेहमीच ट्रोल केलं जातं. परंतु, ती ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते. उर्फी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. ‘बिग बॉस’च्या घरातील साजिद खानच्या एन्ट्रीवरुनही तिने संताप व्यक्त केला होता.