Vallari Viraj And Aalapini Dance Video : अलीकडे सोशल मीडिया हे मनोरंजनाचं एक नवं माध्यम झालं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सोशल मीडियावर सामान्य नेटकऱ्यांबरोबरच विविध क्षेत्रातील मंडळी सक्रिय असतात. मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीसुद्धा या माध्यमाचा चांगलाच वापर करताना दिसतात.
बॉलीवूड असो वा मराठी इंडस्ट्री… अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपल्या कामानिमित्तची माहिती शेअर करत असतात. तसंच अनेकदा स्टायलिश लूकमधील फोटोही शेअर करतात. अनेक अभिनेत्री रिल्सच्या माध्यमातून त्यांचे अनेक डान्स व्हिडीओेसुद्धा शेअर करत असतात.
अशीच सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणारी एक जोडी म्हणजे अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी. झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या लोकप्रिय मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. मालिकेत त्यांनी एकमेकींच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र मालिकेतील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणांनी कायमच चर्चेत राहत असतात. अशातच वल्लरी विराज आणि आलापिनी यांनी सोशल मीडियावर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटातील ‘नवसाची गौराई माझी’ या गाण्यावर सुंदर असा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्यावरील व्हिडीओसाठी वल्लरी आणि आलापिनीने मराठमोळा लूक केला आहे. दोघींनी नऊवारी साडीमध्ये या गाण्यावर सुंदर असा डान्स केला असून वल्लरीने गुलाबी, तर आलापिनीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. गाण्यातील शब्दांचे अचूक भाव त्यांनी या डान्समधून व्यक्त केले आहेत.
वल्लरी विराज आणि आलापिनी डान्स व्हिडीओ
अवघ्या काही क्षणांतच वल्लरी आणि आलापिनी यांचा डान्स व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. व्हिडीओला २५ हजारहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे. तर २५० हून अधिक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. केवळ चाहतेच नव्हे तर अनेक कलाकारांनी सुद्धा वल्लरी-आलापिनीच्या डान्सवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शीतल क्षीरसागर, सीमा घोगळे, अक्षया देवधर, रेवती लेलेसह अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.