२०१० साली आलेला ‘नटरंग’ हा मराठीतला आजवरचा एक ‘कल्ट सिनेमा’ महणून ओळखला जातो. रवी जाधवने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून अभिनेते अतुल कुलकर्णींनी या सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारली होती. तसंच त्यांच्याबरोबर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा होती.

‘नटरंग’ सिनेमा हा तमाशाप्रधान असल्याने या सिनेमातील प्रत्येक गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केलं. ‘नटरंग’ची जवळपास सर्वच गाणी तेव्हाही लोकप्रिय होती आणि आजूनही त्यांची क्रेझ काही कमी झालेली नाही. यातीलच एक गाणं म्हणजे ‘अप्सरा आली’.

सोनाली कुलकर्णीने सिनेमात या गाण्यावर अप्रतिम नृत्यसादरीकरण केलं आहे, यामुळेच ती मराठी इंडस्ट्रीत ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाते. ‘नटरंग’च्या १५ वर्षांनीसुद्धा त्यामधील ‘अप्सरा आली’ या गाण्याचा करिश्मा काही कमी झालेला नाही. आजही हे गाणं चाहत्यांमध्ये तितकंच लोकप्रिय आहे.

‘अप्सरा आली’ या गाण्यावरील डान्सचे अनेकजण व्हिडिओ शेअर करता असतात. अशातच आता या गाण्यावर मराठी अभिनेत्रींनासुद्धा सुंदर असं सादरीकरण केलं आहे, या अभिनेत्री म्हणजे वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ. दोघी सोशल मीडियावर बऱ्याच सक्रीय असतात आणि सोशल मीडियाद्वारे त्यांच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच त्यांनी ‘अप्सरा आली’ गण्यावरील सादरीकरणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

वल्लरी विराज डान्स व्हिडीओ

‘अप्सरा आली’ या गाण्यावर नृत्य करताना वल्लरी आणि आलापिनी यांच्या चेहऱ्यावरील सुंदर हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. तसंच वल्लरी आणि आलापिनी यांनी स्वत:च्या काही अधिकच्या डान्स स्टेप्स केल्या आहेत, ज्या चाहत्यांच्याही पसंतीस पडल्या आहेत. शिवांशू सोनीच्या नृत्यशाळेत वल्लरी आणि आलापिनी यांनी ‘अप्सरा आली’वर डान्स केला आणि याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आलापिनी निसळ डान्स व्हिडीओ

दरम्यान, वल्लरी आणि आलापिनी या दोघींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वैयक्तिकरित्या हा व्हिडिओ शेअर केला आहे. नेहमीप्रमाणेच त्यांचं हे सादरीकरण चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडलं आहे. तशा अनेक प्रतिक्रियासुद्धा चाहत्यांनी या व्हिडिओखाली व्यक्त केल्या आहेत. “अप्रतिम छान”, “नेहमीप्रमाणेच सुंदर”, “खूपच भारी”, “खूपच सुरेख” या अशा अनेक प्रतिक्रियांद्वारे चाहत्यांनी या व्हिडिओला प्रतिसाद दिला आहे.