Vallari Viraj and Aalapini Nisal Dance Video: अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ या नेहमीच विविध संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असतात.

अनेक गाण्यांवर त्या सुंदर सादरीकरण करतात. त्यांनी निवडलेली गाणी, गाण्याच्या ओळींवर चपखल हावभाव आणि त्यांचे सादरीकरण यांतून या दोन्ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येतात. काही वेळा मराठी तर काही वेळा हिंदी गाण्यांवरील डान्सने त्या चाहत्यांसह कलाकारांची मने जिंकून घेताना दिसतात.

वल्लरी विराज व आलापिनी निसळ यांचा ‘ही चाल तुरु तुरु’ गाण्यावर सुंदर डान्स

आता पुन्हा एकदा आलापिनी आणि वल्लरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सुंदर डान्स केला आहे. ‘ही चाल तुरु तुरु’ या गाण्यातील काही ओळींवर वल्लरी व आलापिनी यांनी डान्स केला आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स, हावभाव नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेत आहे.दोन्ही अभिनेत्रींनी या डान्ससाठी साडी नेसली आहे. दोघींचा लूकदेखील लक्षवेधी ठरत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत आलापिनीने ‘ओठांची मोहोर खोल ना’, अशी कॅप्शन दिली आहे. तसेच वल्लरीला टॅग केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

नेटकरी काय म्हणाले?

“वल्लरी तू प्रेम आहेस. पण, आज आलापिनीवरुन नजर हटतच नव्हती”, “हावभाव, गाणं, सगळंच कमाल”, “तुम्ही दोघी खूप छान दिसताय. तुमचा डान्स आणि हावभाव प्रतिम”, “वाह!दोघींचेही किती छान एक्सप्रेशन आहेत”, “खूप गोड हावभाव”, “आज आलापिनीवरुन नजरच हटली नाही”, “कसलं भारी”, “सुंदर”, “कसलं भारी”, “क्यूट”, “वाह”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी वल्लरी व आलापिनी यांचे कौतुक केले आहे. तर अभिनेत्री अक्षया हिंदळकरनेदेखील खूपच सुंदर अशी कमेंट केली आहे.

वल्लरी व आलापिनी यांना नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. आता त्या नुकत्याच हिट अँड व्हायरल या मायक्रो सीरिजमध्ये दिसल्या आहेत. ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये त्यांच्याबरोबर अभिनेता इंद्रनील कामतदेखील दिसत आहे.