‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सर्व सदस्य मराठमोळ्या प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या शोमधील कलाकारही खूपच लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. या कार्यक्रमाची गेले काही महिने सातत्याने चर्चा होत आहे ती ओंकार भोजनेमुळे. त्याने या शोला रामराम केला आणि त्याची नेमकी कारणं कोणती, याबद्दल चर्चा रंगली. अशातच वनिता खरातने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली “मी पोस्ट शेअर केली की…”

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Bhaskar Jadhav On MNS Raj Thackeray
‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की द्यायला लावला?’, भास्कर जाधव यांचा सवाल
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

ओंकार भोजने व वनिता खरात यांनी अनेक स्किट एकत्र केले होते. अशातच ओंकारने शो सोडण्याबद्दल वनिता अप्रत्यक्षपणे बोलली आहे. “शो सोडणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, वैयक्तिक मत आहे, असं मला वाटतं. त्यामुळे त्याबद्दल बोलणारे आपण कोणीच नाही. त्यांना वेगळं काम मिळालं असेल आणि त्यामळे त्यांनी निर्णय घेतला असेल. याबद्दल आपण काहीच करू शकत नाही. प्रत्येकाच्या निर्णयावर त्यांना ट्रोल करणं चुकीचं आहे. आपण चर्चा करत राहणं चुकीचं आहे. प्रत्येकाची त्यांच्या निर्णयामागची कारणं वेगळी असतात,” असं वनिता खरात ‘सकाळ’च्या पॉडकास्टमध्ये म्हणाली.

मराठी, हिंदीपाठोपाठ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातला खुणावतंय टॉलिवूड; म्हणाली, “मला दक्षिणात्य सिनेसृष्टीत…”

वनिता व ओंकार दोघेही चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेक स्किटही एकत्र केले होते. ओंकार वनिताच्या लग्नानंतर घरी भेटायला आला होता, त्याचा एक मजेशीर व्हिडीओही व्हायरल झाला होता. दरम्यान, ओंकारने शो सोडल्यानंतर त्याची आठवण येते का, असा प्रश्न वनिताला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “मी, ओंकार आणि गौरवने खूप स्किट एकत्र केले आहेत. तो माझा खूप चांगला मित्र आहे. आता तो जे करतोय तेही उत्तम आहे. आम्ही पुढे कधीतरी एकत्र काम करू, पण आमची मैत्री कधीच तुटणार नाही.” दरम्यान, ओंकारने शो सोडण्याचा निर्णय घेतल्यावर आपल्याला खूप वाईट वाटलं होतं. त्याला मिठी मारून रडल्याचा खुलासाही वनिताने केला.