टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनबरोबर ‘बिग बॉस १७’ मध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये या जोडप्याची खूप भांडणं पाहायला मिळत आहे. या शोमध्ये अंकिता अनेकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसते. ती वारंवार सुशांतचा उल्लेख करते यावरून तिच्या सासू रंजना जैन यांनी सहानुभूतीसाठी ती असं करत असल्याचं म्हटलं होतं. तर अंकिताच्या आईनेही आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आता तिचा पती विकी जैन यानेही तो सुशांतच्या मृत्यूनंतर कठीण दिवसांत तिच्या पाठीशी कसा उभा राहिला याची आठवण करून दिली.

“सुशांतबद्दलची गोष्ट ही खूप मोठी होती, त्याच्या निधनानंतर मी तुझ्या बाजूने होतो. मी मध्ये कधीच आलो नाही, तुला इंटरव्ह्यू द्यायचे होते आणि मला त्यातही काही अडचण नव्हती. या मुलाखती आणि सर्व गोष्टी कशा हाताळायच्या याबद्दल मी तुझ्यासोबत बसून तुला मदत करायचो. मी नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहिलो आहे. मी कोणालाही तुला प्रश्न विचारू दिले नाही. इथे मी जे काही करतो त्यावर तू सतत प्रतिक्रिया देत असतेस,” असं विकी अंकिताला म्हणाला.

अंकिता लोखंडेला अभिनेत्री असूनही न चुकलेला ‘सासुरवास’

सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्तीने अंकिता लोखंडेला समर्थन दिलं आहे. त्यानंतर विकीने हे विधान केलं. सध्या बिग बॉसमध्ये विकी व अंकिताच्या नात्यात तणाव आल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या फिनालेला अवघे दोन आठवडे बाकी असताना या जोडप्याची भांडणं खूप वाढली आहेत.

Video: विकी जैनच्या वडिलांनी अंकिता लोखंडेच्या आईची काढली लायकी, अभिनेत्रीचा खुलासा; पतीला म्हणाली, “तुझ्या घरात मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत व अंकिता लोखंडे यांनी ‘पवित्र रिश्ता’ मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी एकमेकांना जवळपास सहा वर्षे डेट केलं होतं. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. २०२० मध्ये सुशांतसिंहने आत्महत्या केली आणि मग २०२१ मध्ये अंकिताने विकीशी लग्न केलं.